Maharashtra Weather : गाटपीटमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; पुढील 2 दिवस 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट

गेल्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांना गाटपीटचा फटका सहन करावा लागत आहे. पुढील दोन दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Weather Forecast : गेल्या अनेक दिवसांपासून वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसत असताना विदर्भासह अनेक जिल्ह्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान येत्या दोन ते तीन दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका सहन करावा लागणार असल्याचं चित्र आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निवळला असला तरीही राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टी सक्रिया असल्याचं दिसतंय. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवविला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे सोलापुरात तापमान 40 अंशाच्या पुढे आहे. 

नक्की वाचा - Mumbai water crisis: टँकर संपावर तोडगा निघेपर्यंत मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, आता...


पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान...


जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला. काल 13 एप्रिल रोजीसायंकाळी जळगाव व चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे पिकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाल्याने नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या गारपीटमळे द्राक्ष आणि गहू पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात रविवारी अनेक ठिकाणी वादळी पावसासह गारपीट झाली.