Maharashtra weather Update : पुण्यात रेड अलर्ट, मुंबई आणि दक्षिण विदर्भात 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात 21 ऑगस्ट, गुरुवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला असून अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

17 ऑगस्ट रोजी पुण्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर 19 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाकडून अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयएमडीच्या मते, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाची परिस्थिती पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात रेड आणि ऑरेंज अलर्ट...

रेड अलर्ट - पुणे, चंदपूर आणि गडचिरोलीसह दक्षिण विदर्भातीस काही भाग 

ऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली 

विदर्भात, नागपूर आणि आजूबाजूच्या भागात २४ किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण विदर्भात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाडा, औरंगाबाद, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Marathwada Rain Update : पावसाची धुवाँधार बॅटिंग; हिंगोलीत शेतींचं प्रचंड नुकसान, संभाजीनगरची स्थिती काय आहे?

ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात सरासरी ३०७.५ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज असून १७ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ७.९ मिमी ते १९.१ मिमी पावसाचा अंदाज आहे. नदी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असल्यामुळे रायगड आणि रत्नागिरीमध्ये पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. 

पुण्यात काय असेल पावसाचा अंदाज?

१७ ऑगस्ट रोजी पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर घाट भागात मुसळधार पावसाची चिन्हं आहेत. ज्यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे १९ ऑगस्टपर्यंत पावसाचा अंदाज आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article