जाहिरात

सत्तेची खुर्ची कोणाला मिळणार? NDTV मराठीवरील 'महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात' जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं!

NDTV Marathi Coclave LIVE Updates : आज सकाळी 10 वाजल्यापासून NDTV मराठीवर महाराष्ट्राचा जाहीरनामा पाहता येणार आहे.

सत्तेची खुर्ची कोणाला मिळणार? NDTV मराठीवरील 'महाराष्ट्राच्या जाहीरनाम्यात' जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं!
मुंबई:

राज्यभरात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं (Maharashtra Vidhan Sabha Election) वारं वाहत आहे. दरम्यान सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी दोघांकडून चढाओढ सुरू आहे. दोघांकडूनही मतदाराला आकर्षित करण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधल्या जात आहेत.

या नेत्यांचं व्हिजन काय आहे, महाराष्ट्राचा विकास कसा साधणार? राज्याच्या उन्नतीसाठी सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचा काय आहे प्लान याची इत्यंभूत माहिती मिळविण्यासाठी आज NDTV मराठीवर पाहा (NDTV Marathi Coclave LIVE Updates) महाराष्ट्राचा जाहीरनामा. 

आज सकाळी 10 वाजल्यापासून NDTV मराठीवर महाराष्ट्राचा जाहीरनामा पाहता येणार आहे. दिवसभर सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते उपस्थित राहून आपली भूमिका मांडतील. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ,  शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील, भाजपचे आशिष शेलार, पंकजा मुंडे, काँग्रेसचे नाना पटोले, अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय युवा पॅनलमध्ये वरूण सरदेसाई, संदीप देशपांडे, रुपाली चाकणकर यांच्यामध्ये चर्चा होईल. 

या निवडणुकीत कुणाची सत्ता येणार? मविआ विजयाचा झेंडा फडकवणार? की महायुती..सत्तेचा गड कायम राखणार?... या सगळ्या प्रश्नांसाठी नक्की बघा NDTV मराठीचा हा खास कार्यक्रम 'महाराष्ट्राचा जाहीरनामा'

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
महाराष्ट्राचा जाहीरनामा, महाराष्ट्राचा जहिरनामा LIVE अपडेट्स, NDTV Marathi Conclave LIVE, NDTV मराठी कॉन्क्लेव्ह