
मेट्रोचे काम मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रकल्पा झाल्यानंतर मुंबईचा वेग आणखी वाढणार आहे. पण या कामांमुळे सध्या मुंबईचा वेग रोडावला आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते वाहतूकीला अडचण येत आहे. मुंबईतच नाही तर संपूर्ण एमएमआरमध्ये मेट्रीची कामे सुरू आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आणि मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिले आहे. एनडीटीव्ही मराठीच्या 'NDTV मराठी मंच' या विशेष कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा ))
एमएमआरमध्ये मेट्रोचे जवळपास 374 किमीचे जाळे उभारले जात आहे. त्यातली 200 किमी हे मुंबईतच आहे. त्यातील मेट्रो 1 सुरू करण्यात आली आहे. मेट्रो 3 ही कफपरेड पर्यंत आहे. ही मार्गीका 15 ऑगस्टपर्यंत सुरू होईल. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा मेट्रो 3 चा टप्पा लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार, असून शासनाला उद्घाटन करण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर अंधेरी मानखूर्द, शिवाय विमातळा पर्यंत असणारी मेट्रो याची कामे जोरात सुरू आहे असं अश्वीनी भिडे यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई सुरु असलेलं मेट्रोचे काम हे जवळपास दोन वर्षात पूर्ण होईल. दोन वर्षात मुंबईतलं मेट्रोचं जाळं पूर्ण ताकदीने कार्यान्वीत होईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. टप्प्या टप्प्याने हे काम पुढच्या दोन वर्षात होईल असं ही त्यांनी सांगितलं.
मुंबई प्रमाणे एमएमआरमध्ये ही मेट्रोचे जाळे उभे केले जात आहे. त्याचे काम मात्र तीन ते चार वर्षात पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या उपनगरीय रेल्वेने 80 लाख लोक प्रवास करतात. पण ज्या वेळी मेट्रोचे काम पूर्ण होईल त्यावेळी पुढच्या पाच वर्षात जवळपास एक कोटी लोक मेट्रोने प्रवास करतील असं ही त्यांनी सांगितलं. मुंबईकर रस्त्यां ऐवजी मेट्रोचा अधिक वापर करतील. मेट्रोची ही गुंतवणूक पुढील शंभर वर्ष डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे असं ही त्यांनी सांगितलं. त्यामुळे पुढील दोन वर्षात मुंबईतली तर तीन ते चार वर्षात एमएमआरमधील मेट्रोची कामे पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान मेट्रोची कामे सुरू असल्याने मुंबईत रस्ते वाहतूकीत अडचणी येत असल्याचे अश्वीनी भिडे यांनी मान्य केले. पण ही कामे आव्हानात्मक आहेत. मुंबईची रचना, उपलब्ध जागा यानुसार कामं सुरू आहेत. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी रस्ते पुर्ववत केले आहेत. सध्या याचा त्रास होईल पण ते काम केले नाही तर पुढच्या काळात होणारा त्रास हा भयंकर असेल. त्यातून होणारी कोंडी ही मोठी असेल असं ही त्या म्हणाल्या. त्यामुळेच मेट्रोची कामे जलदगतीने करण्यावर आपला भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world