जाहिरात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबरचा हप्ता 'या' दिवशी येणार, पण... अदिती तटकरेंचे महत्त्वाचे आवाहन

Mukhyamantri Ladki Bahin Yojana E- KYC Update News: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत आणि ईकेवायसी बाबत माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबरचा हप्ता 'या' दिवशी येणार, पण... अदिती तटकरेंचे महत्त्वाचे आवाहन

Mukhyamantri Ladki Bahin Yojana:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत आणि ईकेवायसी बाबत  माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्याचा निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या, म्हणजेच ५ नोव्हेंबर  पासून सुरुवात होत आहे. मात्र 18 नोव्हेंबरपर्यंत ईकेवायसी करुन घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 

काय म्हणाल्या अदिती तटकरे? 

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे," अशी माहिती अदिती तटकरेंनी दिली आहे. 

Dog Attack: भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ! एकाच दिवशी 24 जणांना चावला, परिसरात भीतीचे वातावरण

ईकेवायसी करुन घ्या...

"महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती'," असं आवाहन त्यांनी केले आहे. 

e-KYC प्रक्रिया कशी करावी?| E- KYC Step By Step Process

  • योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ [संशयास्पद लिंक काढली] वर भेट द्या.
  • मुख्य पृष्ठावरील 'ई-केवायसी बॅनर' वर क्लिक करा.
  • आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) भरा.
  • आधार पडताळणीसाठी संमती देऊन 'Send OTP' वर क्लिक करा.
  • मोबाईलवर आलेला OTP (वन-टाइम पासवर्ड) टाकून 'Submit' वर क्लिक करा.
  • पुढील पृष्ठावर जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक घोषणांवर टिकमार्क करून पुन्हा 'Submit' बटण दाबा.
  • शेवटी, "Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे" असा संदेश दिसेल.

नक्की वाचा - Government Holiday: 2026 च्या सरकारी सुट्ट्या जाहीर, किती सुट्ट्या झाल्या कमी? पाहा संपूर्ण लिस्ट

दरम्यान,  ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तात्काळ ती पूर्ण करावी. ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील हप्त्यांपासून लाभ मिळणे बंद होऊ शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे, आपल्या हक्काचा सन्मान निधी नियमितपणे मिळवण्यासाठी १८ नोव्हेंबरची अंतिम मुदत पाळणे सर्व लाभार्थींसाठी अनिवार्य आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com