
Malegaon Bomb Blast Case: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनी निकाल लागला आहे. मुंबईच्या एनआयए कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. स्फोट घडवल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिला. या निकालानंतर राज्यात हिंदूत्ववादी संघटनांनी जल्लोष केला आहे. यावेळी मालेगावमध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले.
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी जल्लोष केला. मालेगावमध्ये कार्यकर्त्यांनी ढोल ताश्यांच्या गजरात साध्वी प्रज्ञा सिंग यांची प्रतिमा घेत या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटना फटाके फोडण्यास केला. ज्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, ज्यामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरणही पाहायला मिळाले.
Malegaon Bomb Blast: 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं', निर्दोष सुटकेनंतर साध्वी प्रज्ञाला अश्रु अनावर
तब्बल सतरा वर्षा नंतर मालेगाव स्फोटातील प्रज्ञासिंह ठाकुर सह सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानं साधू संतांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तरखंडातील जोगेश्वरधाचे मंहत महादेव दास यांनी यावर आनंद व्यक्त करत प्रज्ञासिंग ठाकूर ह्या षडयंत्रातून काँग्रेस आंतकवादच्या शिकार झाल्याच म्हटले आहे. निकाल येण्यासाठी खुप उशिर लागला असला तरी न्यायालयाच्या निर्णयाच स्वागत करत असून ही विजय एकट्या प्रज्ञासिंह ठाकूर यांचा नसून त्या सर्व पिडीत साधूसंताचा असल्याच मंहत महादेव महाराज यांनी शिर्डीत म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला.
(नक्की वाचा- Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरण! सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world