Malegaon Sugar Factory Election Result : 'अजित पवारांचं चेअरमन पदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही'; तावरेंचा दावा

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीतल पहिल्या निकालात ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांना 91 मते मिळाली असून भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मतं मिळाली आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

(Malegaon Sugar Factory Election Result) माळेगाव साखर कारखाना निवडणुकीतील पहिला निकाल समोर आला आहे. ब वर्गातून अजित पवार विजयी झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांना 91 मते मिळाली असून भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मते मिळाली आहेत. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीतल पहिल्या निकालात ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांना 91 मते मिळाली असून भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मतं मिळाली आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यानंतर विरोधी पॅनलकडून प्रतिक्रिया येत आहे. अजित पवारांचं चेअरमन पदाचं स्वप्न पूर्ण होणार नाही. एक जागा आली म्हणजे सर्व पॅनल नाही असा दावा  रंजनकुमार तावरे (Ranjan Kumar Taware) यांनी केला आहे. सभासद आम्हालाच साथ देतील 20 ही जागा आम्हीच जिंकणार असं रंजनकुमार तावरे यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा -  Malegaon Sugar Factory Election Result: माळेगाव कारखाना निवडणुकीत क्रॉस वोटिंग, पॅनेल टू पॅनेल मतदान नाही

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. यावेळी ब प्रवर्गातील मतमोजणी पार पडली. यामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचे ब वर्गाचे उमेदवार अजित पवार यांना तब्बल 91 मते मिळाली तर त्यांच्या विरोधात असणारे सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली. यात अजित पवारांचा 91 मतांनी विजय झाला. यावेळी अजित पवारांचे कट्टर विरोधक सहकार बचाव शेतकरी पॅनलचे रंजन तावरे यांनी संताप व्यक्त केला.