
मालवणातील राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारला जाणार आहे. या पुतळ्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. या निविदेचा तपशील जाहीर झाला आहे. आधीचा पुतळा हा 28 फुटांचा होता, नवा पुतळा हा 60 फुटांचा असणार आहे. शिवरायांच्या पुतळ्याची पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत उंची ६० फूट असेल असे निविदेच्या तपशीलात म्हटले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
नक्की वाचा: मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रोची प्रतीक्षा संपणार, तिकीट ते मार्ग वाचा सर्व माहिती
8 महिन्यांत कोसळला होता पुतळा
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. नौदल दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला होता. यानंतर राज्य सरकारसह केंद्र सरकारवरही जबरदस्त टीका झाली होती. यामुळे सरकारने लवकरच नवा पुतळा उभारण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानुसार या पुतळ्याच्या उबारणीसाठी निविदा काढण्यात आली आहे.
नक्की वाचा: मोठी बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान उतरणार, तारीख झाली निश्चित
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर उभारणार पुतळा
निविदेच्या अटी,शर्तींमध्ये या पुतळ्याची उभारणी स्टॅच्यू ऑफ युनिटी्च्या धर्तीवर करण्यात येणार असल्याचे म्हटले असून पुतळ्याची उभारणीवर ही IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवणार आहेत. या पुतळ्याच्या उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुतळ्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून या समितीच्या प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर असणार आहेत. त्यांच्याशिवाय या समितीचे सदस्य कोण असतील ते पाहूयात
- सदाशिव साळुंके, सचिव, सा.बां.विभाग(रस्त)
- एस.दोराईबाबू, कोमोडोर, भारती नौदल
- आर.एस.जांगीड, IIT मुंबई ( सिव्हील इंजिनिअर)
- एस.परीदा IIT मुंबई ( मेटलर्जिकल सायन्स)
- राजीव मिश्रा, संचालक, जेजे स्कूल ऑप आर्किटेक्चर
- राजे रघुजी आंग्रे, नौदल इतिहास संशोधक
- जयसिंह पवार, इतिहासतज्ज्ञ
निविदेत काय म्हटले आहे?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने पुतळ्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी ही निविदा आहे.हा पुतळा 60 फुटी असणार असून तो उभारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world