
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता आणखी फास्ट होणार आहे. मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावरील मेट्रो 3 मार्गातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (शनिवार 5 ऑक्टोबर) रोजी या मार्गाचं लोकार्पण झालं. मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे. त्यामुळे याची मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे. शहराच्या वर्दळीच्या भागातून ही मेट्रो जाणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांची ट्रॅफिक जाम आणि लोकलच्या गर्दीतून सुटका होणार असून त्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
मुंबई मेट्रो 3 चा मार्ग काय आहे? कोणता मार्ग पहिल्या टप्प्यात सुरु होतोय? त्यामध्ये काय सुविधा आहेत? त्याचं तिकीट काय? ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोणत्या मार्गाचं लोकार्पण ?
आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं आहे. पहिल्या टप्प्यात 12.44 किलो मीटरच्या अंतरावर मेट्रो धावणार आहे. यामध्ये 10 स्टेशन असून यातील नऊ स्थानके ही अंडर ग्राउंड आहेत तर 1 स्थानक ग्रेड टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहेत.
#WATCH | PM Modi flags off metro train between BKC to Aarey JVLR section of Mumbai Metro Line -3 pic.twitter.com/CKkWxWtVAT
— ANI (@ANI) October 5, 2024
किती झाला खर्च ?
2011 मध्ये मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत २३ हजार कोटी होती त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हा प्रकल्प पूर्णत्वास आला मेट्रो कारशेडचे काम 90 टक्के पुर्ण झाले आहे. 22 हेक्टर जागेवर ते साकारले आहे. आज मेट्रो-3 प्रकल्पाची किंमत 36 हजार कोटी झाली आहे. आरेमधील कारशेडला झालेला विरोध त्या भोवतीच्या राजकारणामुळे मेट्रोची किंमत वाढली.
( नक्की वाचा : दिल्ली मेट्रोचा एक संपूर्ण मार्ग 1 जुलैपासून ड्रायव्हरलेस, वाचा कसं होणार सर्व काम? )
किती मिनिटांनी धावणार मेट्रो?
आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यासाठी ६.५ मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील प्रत्येक फेरीमध्ये २५०० प्रवासी एका वेळेला प्रवास करतील. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे.
मेट्रो - 3 मार्गावर कोणती स्टेशन?
मेट्रो-3 मार्गावरील पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. त्यामध्ये बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताक्रूझ मेट्रो, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टी 1, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टी 2, मरोळ नाका, एमआयडीसी अंधेरी, सीप्ज, आरे, आणि जेव्हीएलआर ही 10 स्टेशन आहेत.
कुणाला होणार फायदा?
आरे ते BKC हा मार्ग मुंबईतील प्रमुख व्यवसाय आणि कामाचे केंद्र मानलं जातं. त्याचबरोबर पुढील टप्प्यातील नरिमन पॉईंट, कफ परेड, लोअर परेल, SEEPZ/MIDC या ठिकाणी देखील रोज लाखो मुंबईकर कामानिमित्त ये-जा करतात. या सर्वांना या मेट्रोचा फायदा होणार आहे.
मेट्रो 3 मुळे मुंबईकरांना विमानतळावर जलदगतीनं जाता येईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस T-2 आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल T-1 या स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल T-2 स्टेशनमध्ये 19 मीटर लांब भारतामधील सर्वात मोठा इलेव्हेटर जिना आहे. तसंच मरोळ नाका स्टेशनमधून मेट्रो -3 आणि मेट्रो -1 ला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती एमएमआरसी संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे.
मेट्रो ड्रायव्हरलेस असल्यानं रेल्वे स्टेशनमध्ये फायर सेफ्टी, मेट्रो, डोअर ओपनिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, इलिव्हेटर मॅनेजमेंटसह आपत्कालिन मदतीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
( नक्की वाचा : 99 लाख वेटिंग, 10 लाख तिकीट! काय आहे Coldplay ज्यासाठी भारतीय फॅन्स करतायत पाण्यासारखा पैसा खर्च )
किती इंधनाची होणार बचत?
या मेट्रो 3 मुळे साडेचार लाख वाहनफेऱ्या दरदिवशी कमी होण्यास मदत होईल. तसेच 2031 पर्यंत ही संख्या साडेसहा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अडीच लाख लिटर इंधनाची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे 2031 पर्यंत साडेतीन लाख लिटर इंधनाची बचत होण्यात मदत होईल. तसेच दरवर्षी 10 हजार मेट्रीक टन कर्बवायूंचं प्रमाण कमी होईल. अडीच लाख टन प्रदुषित वायू प्रतीवर्षी कमी होण्यास मदत होईल.
किती आहे तिकीट?
मेट्रो 3 मधील पहिल्या टप्प्याात किमान तिकीट 10 रुपये असून कमाल तिकीट 50 रुपये असेल, अशी माहिती आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर कमाल तिकीट 70 ते 80 रुपये असण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world