शुभम बायस्कार, अमरावती
Amravati News : अमरावतीच्या बडनेरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. लग्नसमारंभात घुसून नवरदेवावर जीवघेणा हल्ल्या झाला होता. या घटनेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. डीजेचे पैसे थकवल्याने आरोपी राजू बक्षी याने नवरदेव सुजलराम समुद्रेवर याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ल्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून NDTV मराठीला मिळाली आहे.
डीजेच्या पैशांवरून वाद
सुजलराम समुद्रे यांचा 9 नोव्हेंबर रोजी अंजनगाव सुर्जी येथे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान डीजेचे पैसे न दिल्या कारणाने हा हल्ला झाल्याची माहिती पुढे येत आहे. आरोपी राजू बक्षी याने साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजलराम समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोघांनी नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. लग्नासाठी सुरू असलेल्या ड्रोन शूटमध्ये हा व्हिडीओ कैद झाला आहे.
(नक्की वाचा- Sangli News : वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या अध्यक्षांची हत्या! सांगलीत 'मुळशी पॅटर्न' स्टाईल खून)
नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. नवरदेवाच्या वडिलांना आरोपींचा पाठलाग करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी आणि नवरदेव मित्र
यानंतर आक्रमक झालेल्या समुद्रेच्या नातेवाईकांनी राजूच्या गाडीची व घराची जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. नवरदेव सुजलराम समुद्रे व आरोपी राजू बक्षी हे मित्र असल्याचही माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हल्ल्यानंतर आरोपी बक्षी व त्याचा अल्पवयीन मित्र फरार आहे. त्याच्या मागावर चार पथके पाठवण्यात आली आहे.