Pune News : पुणे जिल्ह्यातील बिबट्यांचं 'घर' हाऊसफुल्ल! उरलेल्यांना ठेवायचं कुठं?

पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांत बिबट्या-मानव संघर्ष चांगलाच चिघळला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुणे जिल्ह्याच्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांत बिबट्या-मानव संघर्ष चांगलाच चिघळला आहे. अवघ्या वर्षभरात 54 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून, एका महिन्यात पिंपरखेड गावात तीन जणांचा बळी, त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत असून बिबटे तत्काळ हलवावेत अशी मागणी करत आंदोलनेही झाली.

माणिकडोहमधील बिबट्या निवारण केंद्र 2002 पासून कार्यरत असलं तरी वर्षानुवर्षे दुसरे कोणतेच निवारा केंद्र न उभे राहिल्याने पकडलेल्या बिबट्यांना ठेवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने बिबटे पकडून इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला असून वनतारामध्ये काही बिबटे नेण्याच्या संदर्भात हालचाली सुरू होत्या. मात्र तिथेही केवळ 50 बिबटे स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. एका हल्लेखोर बिबट्याला तर ठार मारण्याचे आदेशही देण्यात आले. सध्या माणिकडोह केंद्र पूर्ण क्षमतेने भरले असून 17 बिबट्यांना पिंजऱ्यांत ठेवण्यात आलं आहे. त्यामुळेच याच परिसरात नवीन बिबट्या निवारण केंद्र उभारण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : पुण्यात भीतीचं वातावरण, रात्री फिरणं झालंय धोक्याचं; पहाटे 3 वाजताचा धक्कादायक Video आला समोर

20 दिवसात तिघांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या ठार

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात 12 ऑक्टोबर 2025 रोजी सहा वर्षाच्या शिवन्या बोंबे, 22 ऑक्टोबर रोजी 70 वर्षांच्या भागुबाई जाधव आणि 2 नोव्हेंबर रोजी 13 वर्षांच्या रोहन बोंबे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला होता. या बिबट्याच्या हल्ल्यात सलग झालेल्या या दुर्दैवी घटनांमुळे शिरूर परिसरामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पथकाचं पाचारण करण्यात आलं होतं. या पथकाने कॅमेरा ट्रॅप, ठसे निरीक्षण आणि थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली. अखेर रात्री सुमारे 10.30 वाजता घटनास्थळापासून 400–500 मीटर अंतरावर बिबट दिसून आल्यावर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला. मात्र तो अपयशी ठरल्यानंतर बिबट चवताळून प्रति हल्ला करत असताना शार्प शूटरने गोळी झाडल्याने बिबट ठार झाला. 

Topics mentioned in this article