Manikrao Kokate News: रम्मीचा डाव भोवला! माणिकराव कोकाटेंची क्रीडा खात्यावर उचलबांगडी, नवे कृषिमंत्री कोण?

Manikrao Kokate News: दत्तात्रय भरणे हे कारभार पाहतील तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता  क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी असेल.

जाहिरात
Read Time: 1 min

Manikrao Kokate News:  विधान भवनातील रम्मीचा डाव अखेर माणिकराव कोकाटे यांना चांगलाच महागात पडला आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या जागी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे हे कृषिमंत्री म्हणून कारभार पाहणार आहेत तर भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाईन रम्मीचा डाव खेळताना दिसले होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला होता. एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत असताना माणिकराव कोकाटेंच्या रम्मीच्या डावामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा, अशीही मागणी होत होती.

'कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये', केंद्र सरकारला फडणवीसांची विनंती काय?

विरोधकांच्या आक्रमकपणामुळे आणि राज्यभरातील शेतकऱ्यांचा तीव्र संताप पाहता अखेर आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखाते काढून घेण्यात आले आहे. राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे हे कारभार पाहतील तर माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता  क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी असेल.