जाहिरात

…तर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

तुमची मनमानी मी ऐकून घेणार नाही.फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना मराठ्यांच्या विरोधात घातले. त्यांनी माझ्या विरोधात एसआयटी लावली. मला जेजे बोलले त्याच्या मतदारसंघात जाऊन कचका दाखवायचा असल्याचेही,  मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

…तर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

स्वानंद पाटील, बीड

मनोज जरांगे यांनी घोंगडी बैठकीच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलच फैलावर घेतलं.देवेंद्र फडणवीस मला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतरवाली सराटी येथे चार दिवसाला नवीन कुणालातरी पाठवत होते, अशी खोचक टीका जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. मराठ्यांच्या वेदना त्यांना नाही समजायच्या. मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला की संपला समजा हे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलंय. मराठ्यांशिवाय सत्ता टिकू शकत नाही.पाडून लोकसभेत ताकद दाखवली. आता मराठ्यांना निवडून आणून दाखवण्याचे आवाहनही मनोज जरांगे यांना मराठा बांधवांना केलं.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैद्यनाथाच्या भूमीत सांगतो मराठा आरक्षणाचा विरोध केलेल्या नेत्याला राजकीय सत्तेचा फायदा घेऊ देणार नाही. माझ्यावर ट्रॅप टाकणाऱ्या फडणवीसांनी मराठ्यांच्या घरी जाऊन बसावे, त्यांच्या वेदना समजून घ्याव्यात.  मराठा बांधव पायाला फडकं बांधून रात्री शेतात काम करतो. तिकडे पालक एक-एक रुपया मागे ठेऊन लेकरं शिकवत आहेत. या वेदना त्यांना समजणार नाहीत, असं  जरांगेंनी म्हटलं.

तुमची मनमानी मी ऐकून घेणार नाही.फडणवीस आणि मराठ्यांच्या आमदारांना मराठ्यांच्या विरोधात घातले. त्यांनी माझ्या विरोधात एसआयटी लावली. मला जेजे बोलले त्याच्या मतदारसंघात जाऊन कचका दाखवायचा असल्याचेही,  मनोज जरांगे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा -  "बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे", अजित पवार असं का म्हणाले?)

तुमच्या हट्टापायी आमचे लेकरं मारायला निघाला आहात. मराठ्यांचा अंत पाहू नका नाहीतर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही. माझ्या नादाला लागू नका. समाज उठला तर पळायला जागा भेटणार नाही, असा इशारा यावेळी मनोज जरांगे यांनी फडणवीसांना दिला.

(नक्की वाचा - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?)

मराठा, कुणबी एक असताना 2004 चा कायदा तुम्ही रद्द केला. आम्हाला कोणी नोंदी दिल्या जात नाहीत. फडणवीस यांना फक्त मराठ्यांच्या जीवावर सत्ता लागते. त्यांनी जनतेच्या पैशावर मराठ्याचे आमदार पाळले आहेत. मराठ्यांचा आमदार जातीला बाप म्हणण्यापेक्षा पक्षाला बाप मानतोय. म्हणून मी त्यांच्या मागे लागलोय, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
रात्रीच्या जेवणातील या चुका ठरू शकतात तुमचं वजन वाढण्याचं कारणं...
…तर महाराष्ट्रात तुम्हाला पाय ठेवू देणार नाही, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
Ganesha in the mosque in village in Sangli connection with pune Panshet Dam
Next Article
सांगलीतील गावात मशिदीत बाप्पा विराजमान, या प्रथेचं अन्  पुण्याच्या पानशेत धरणाचं आहे कनेक्शन