मनोज जरांगेंचं ठरलं! २५ दिवसानंतर पुन्हा एल्गार, विधानसभेची खास रणनितीही सांगितली; वाचा संपूर्ण मुलाखत

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगि्तले तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 'मराठा आरक्षणाचा लढा कायम सुरु राहील. यांचा पोळा २५ दिवसांचा आहे. २५ दिवसांचा निवडणुकांचा पोळा संपला की मराठे पुन्हा भिडणार. त्यांना सांगितलं आहे, आपल्याला जिंकायचं आहे.. असे म्हणत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आवाज उठवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज्याच्या विधानसभा निवडणुकांतून माघार का घेतली याचे कारण सांगितले तसेच मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा उभारणार असल्याचे संकेत देत पुढील रणनितीही स्पष्ट केली आहे. 

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

'असिम सरोदे हे मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी आले होते. तरी आम्हाला त्यांचा तिकडे ओढ आहे, अशी कुणकुण लागली होती. ते आरक्षणावरच जास्तीत जास्त बोलले, त्यांना त्याबाबत चांगली माहिती आहे. त्यांनी १५- २० मिनिटे याबाबत चर्चा केली. निवडणुकांबाबत माझ्याशी सर्वच चर्चा करतात, भाजपवालेही बोलत असतात, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात काय होईल ते १५ तारखेनंतर सांगतो. विधानसभेला उभे राहिलेले बंडखोर हे सरकारनेच उभे केले आहेत. तिकीटही त्यांनीच दिले आहेत.मी संपूर्ण महाराष्ट्रात जाणार, फिरणार आहे. मी झोपत नसतो, भुत लागल्यासारखा खेळ आहे. मी माझ्या समाजासाठी जाणार आहे, कुणाला पाडायला जाणार नाही. मी नावही घेत नाही. जेवढे होईल तेवढ्या तालुक्यात जाणार आहे,' असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. 

नक्की वाचा: कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?

आरक्षणाचा लढा सुरुच राहिलं...

'आरक्षणाचा लढा कायम सुरु राहील. यांचा पोळा २५ दिवसांचा आहे. २५ दिवसांचा निवडणुकांचा पोळा संपला की मराठे पुन्हा भिडणार. त्यांना सांगितलं आहे, आपल्याला जिंकायचा आहे.  आमचा आम्हाला लढा जिंकायचा आहे. समाजात दुफळी निर्माण होऊ द्यायची नव्हती, ती वाचवायची होती.  समाजाने माझ्या खांद्यावर मान टाकली. सहा कोटी मराठा समाजाला मान घाली घालावी लागली असती तर मला सहन झाले नसते. समाजाची मान उंचवावी असं काम करायचे होते. म्हणून समीकरण जुळत नसेल तर राजकारण नको असं ठरवलं.  एका जातीवर निवडणूक लढणे शक्य नव्हते,' असे म्हणत जरांगे पाटील यांनी विधानसभेतून माघार घेण्याचे कारण स्पष्ट केले. 

ट्रेडिंग बातमी: राजकारणाचा चिखल, निवडणुकीच्या रणधुमाळीत कुत्रा-डुक्कर; कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?