
Manoj Jarange Patil Mumbai Protest: मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला आज चौथा दिवस आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांना गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. सीएसएमटी स्थानकात तर आंदोलकांना लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सर्व आंदोलकांना हात जोडून शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 'मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण का देत नाहीत? त्यांना मराठ्यांचा एवढा राग कशाला आहे?' 'मी पत्रकार बांधवांना सांगतो की, मराठ्यांची पोरं नाही, तर सरकार हुल्लडबाजी करतंय. त्यांनी आरोप केला की, 'चार महिन्यांपूर्वीच आम्ही सरकारला सांगितले होते की आम्ही मुंबईत येणार नाही, आमच्या मागण्या सोडवा.' तसेच 'आंदोलक हुल्लडबाजी करत नाहीत, सरकार हुल्लडबाजी करत आहे. सरकार जाणीवपूर्वक मराठ्यांचा प्रश्न सोडवत नाहीये,' असा थेट आरोपही त्यांनी केला.
Sumona Chakravarti: 'आंदोलकांनी कार अडवली, घाणेरडे चाळे अन्..' अभिनेत्रीने सांगितला भयावह अनुभव
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'मनमानी करणारे मुख्यमंत्री' असल्याचा आरोप केला. 'हुल्लडबाज आणि मस्तीत जगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक मराठ्यांचा प्रश्न सोडवला नाही, राज्यात अशांतता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी हे केले,' असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. 'मुख्यमंत्री वारंवार मराठ्यांना हिन वागणूक देतात आणि मराठ्यांचा अपमान करतात. त्यामुळे हुल्लडबाज आंदोलक नाहीत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world