पहिलीपासून (Marathi Language Controversy) हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले होते. यानंतर राज्य सरकारने शालेय शिक्षणातील पहिलीपासून हिंदी सक्ती हा निर्णय मागे घेतला. याच्या विजयी जल्लोष मेळाव्यात तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. हे दृश्य पाहून शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वरळीतील डोम येथे आयोजित केलेल्या विजयी मेळाव्यात अभूतपूर्व गर्दी झाली होती. दरम्यान या ठाकरे बंधुंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजप मंत्री आशिष शेलार यांनी मनसे (Ashish Shelar's big statement on MNS) कार्यकर्त्यांच्या विरोधात मोठं विधान केलं आहे. त्यांनी मनसेची तुलना थेट पहलागममधील दहशतवाद्यांशी केली आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पडसाद पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा - Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: मराठी भाषा ते युती; राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
थेट पहलगाममधील दहशतवाद्यांशी तुलना
पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, इथे सगळे भाषा विचारून मारत आहेत. यांच्यात नेमका काय फरक आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले, भाजप सत्तेत मोठा भाऊ आहे. त्यामुळे आम्ही संयमाने घेत आहोत. मात्र असं असलं तरी नीट वागण्याची तंबी आशिष शेलार यांनी दिली आहे.