Marathi vs Hindi : महाराष्ट्रातील अनेक भागात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद सुरू आहे. गेल्या अनेक दिवसात भाषा वादाची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्त्यांसोबत वादाची अनेक प्रकरणं चर्चेत आहेत. आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ते बाजारात एका महिलेला मराठीत बोलण्याची जबरदस्ती करतात. महिला तिथं उभं राहून त्यांना प्रत्युत्तर देत आहे.
ही घटना मुंबईतील घाटकोपर भागात घडली. ही महिला येथे मदन केटरर्स नावाचा ढाबा चालवते. काही लोकांनी महिलेला घेरले आणि तिला मराठीत बोलण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, संजीरा देवी नावाची महिला आपल्या घरासमोर उभी आहे. तिने पाहिलं की काही लोक तिच्या घराबाहेर उभे होते. यानंतर तिने त्यांना बाजूला व्हायला सांगितलं. यावर समोरच्यांनी तिला मराठीत बोलायला सांगितलं. तिने मराठी बोलण्यास नकार दिला. यानंतर वादाला सुरुवात झाली. जमावातील एक व्यक्ती तिला मराठीत बोलायला सांगत होती.
नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा
यानंतर महिलेनेही त्यांना प्रत्युत्तर दिलं. 'मी मराठीत बोलणार नाही. तुम्ही हिंदीत बोला. तुम्ही हिंदुस्तानी नाही का?' असा सवाल तिने उपस्थित केला. यानंतर जमावाने महाराष्ट्र महाराष्ट्र घोषणा देण्यास सुरुवात केली.