Marbat 2025 : नागपुरातील 144 वर्षांचा ऐतिहासिक वारसा, आज मारबत मिरवणूक; डोनाल्ड ट्रम्पही झळकणार? 

144 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला नागपूरचा मारबत उत्सव (Marbat 2025) सुरू आहे. प्रसिद्ध मारबतची मिरवणूक आज (23 ऑगस्ट 2025) निघणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Marbat Procession in Nagpur: 144 वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला नागपूरचा मारबत उत्सव (Marbat 2025) सुरू आहे. या उत्सवात शहरातील विविध मंडळे समाजातील ज्वलंत प्रश्नांवर प्रहार करणारे बडगे (प्रतीकात्मक पुतळे) उभारले जातात. यावर्षीचे बडगे दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता अशा विषयांवर लक्ष केंद्रीत करणारे आहेत.नागपूरमधील प्रसिद्ध मारबतची मिरवणूक आज (23 ऑगस्ट 2025) निघणार आहे. 

मारबत हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक व्यंग आणि जनजागृतीचा मंच आहे. “इडा-पीडा घेऊन जा रे मारबत” अशा घोषणांमधून लोक आपल्या अडचणी, समस्या आणि त्रास यांचे प्रतीकात्मक उच्चाटन करतात. यंदा विशेषतः महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे दुःख, तसेच स्मार्ट मीटरच्या बिलांबद्दलचा असंतोष हे मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणार आहेत.

नक्की वाचा - Vande Bharat Train : पुणे-नागपूरसह वैष्णो देवीलाही जाणं सोपं होणार; तिकीट दर, वेळ वाचा सर्वकाही

यंदा काय असेल खास? 

मारबत महोत्सवातील देखाव्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रतीकात्मक पुतळाही झळकणार आहे. अलीकडेच जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगामजवळ भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दहशतवाद्यांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावर लादलेल्या अवास्तव कराच्या धोरणावरही टीका केली जाणार आहे. त्यामुळे यंदा नागपूरकरांची घोषणाबाजी केवळ स्थानिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय प्रश्नांनाही स्पर्श करणारी आहे. नागपुरातील नेहरू पुतळा चौक, कोतवाली चौक, गांधी पुतळा चौक, व्हीटी पार्क चौक, अमरावती रोडसह विविध भागांतून बडगे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. शहरातील विविध मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांच्या मंडळांनी यंदा मारबत महोत्सवात महागाई, वाढते वीजबिल, स्मार्ट मीटरची समस्या, तसेच वाढत्या व्यसनाधीनतेवर जनजागृती करणारे पुतळे उभारले आहेत. यामधून नागरिकांनी प्रशासन आणि सरकारला दिलेला थेट संदेश लक्षवेधी ठरणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article