Matheran News : माथेरान आजपासून बंद! पर्यटकांसाठी स्थानिकांनी उचलला आवाज

Matheran Bandh News : दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या मागणी केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

मेहबूब जमदार, रायगड

माथेरानमध्ये पर्यटकांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात पर्यटन बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या समितीने आजपासून माथेरान बंदची हाक दिली आहे. माथेरान बंदला हॉटेल इंडस्ट्रीसह ई रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे. 

माथेरानचे प्रवेश शुल्क जेथे घेतले जाते त्या दस्तुरी नाक्यावर  येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पर्यटकांची कशी होते फसवणूक?

माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. पर्यटकांना बळजबरीने गावात येण्याऐवजी पॉईंट्स दाखवून उशीरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनी ट्रेन बंद असून ई रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते, अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल केली जाते आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते. 

दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली नाही तर माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशाराही या समितीने पोलीस अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकारी वर्गाला तसेच पोलीस ठाण्यात सुद्धा लेखी निवेदनाद्वारे दिला होता.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nagpur Crisis News: दगड-विटांचा मारा, गाड्यांची जाळपोळ, परिसरात तणाव... नागपूर का पेटलं?

सुंदर माथेरानची बदनामी करणाऱ्या घोडेवाल्यांवर येथील प्रशासनाने जरब बसवावी. यासाठी हे माथेरान बेमुदत बंदचे आवाहन केले आहे. 27 फेब्रुवारीला महसुल विभाग, नगरपालिका, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला या आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. पण कुठल्याच प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने माथेरान बचाव संघर्ष समितीने नाराजगी प्रकट केली. 19 दिवसांचा वेळ देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर नाईलाजास्तव माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार 18 मार्च पासून माथेरान बेमुदत बंद राहणार आहे.

ट्रेंडिंग बातमी - Crime News: सेल्फीमुळे पकडला गेला चोर, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच साधत होता डाव

जोपर्यंत स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात केलेल्या मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही तोपर्यंत हे पर्यटनस्थळ बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा ई रिक्षाची सेवा बंद करण्यात येणार आहे, असे ई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article