डोंगर माथ्यावर वसलेल्या थंड हवेचं जगप्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील पोस्ट कार्यालयामध्ये येणारे पार्सल आता ड्रोनच्या साहाय्याने येणार आहे. पोस्टातील पार्सलची हवाई मार्गे वाहतूक होणार आहे. माथेरान येथे यासंदर्भात यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामुळे माथेरानमधील टपाल खाते आता अधिक हायटेक होणार असल्याची चर्चा माथेरानकरांमध्ये सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंगर माथ्यावर समुद्र सपाटीपासून सुमारे 800 मीटर वृक्षाच्छादित घनदाट जंगलात वसलेले थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि येथील नागरिकांना टपाल सेवा ही जलद गतीने व्हावी. यासाठी दूरसंचार व पोस्ट खाते यांनी हा निर्णय घेतला आहे, यानुसार, कर्जत पोस्ट कार्यालयाच्या इमारतीवरून माथेरान पोस्ट कार्यालय असे ड्रोन उडविण्यात येणार आहेत. याची प्रात्यक्षिक चाचणी प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
नक्की वाचा - VIDEO : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, मागचा भाग तुटला
या राबविण्यात आलेल्या चाचणीमध्ये माथेरान पोस्ट कार्यालयाच्या समोरील फन टाइम रेस्टोरंट अशी चाचणी करण्यात आली. कर्जत पोस्ट कार्यालयाच्या इमारतीवरून माथेरान पोस्ट कार्यालय ते माथेरान पोस्ट कार्यालयाच्या समोरील फन टाइम रेस्टोरंट दरम्यान चाचणी घेण्यात आली. या दरम्यान साधारण 9 किलो 800 ग्रॅम वजन असलेली पार्सलची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात आली. त्या चाचणी दरम्यान हे ड्रोन अवघ्या 15 मिनिटात माथेरानमध्ये यशस्वीपणे पोहचले. भविष्यात कर्जत येथून माथेरान शहर तसेच अशा दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून पार्सल आणली जातील, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोस्ट खात्याकडून देण्यात आलेली नाही.