जाहिरात

VIDEO : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, मागचा भाग तुटला

Keadarnath helicopter crashed : मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्सचे होते, जे रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते.

VIDEO : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, मागचा भाग तुटला

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर अॅम्बुलन्स अपघातग्रस्त झाली आहेत. हेलीकॉप्टर अॅम्बुलन्स ऋषिकेश एम्सची होती, जी ऋषिकेशहून केदारनाथला जात होती. एम्सने या घटनेची पुष्टी केली आहे. इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टरचा मागील भाग तुटल्याने ही दुर्घटना घडली.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सुदैवाने, विमानातील कोणत्याही प्रवाशांना इजा झाली नसून सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्सचे होते, जे रुग्णाला घेण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते. पण हेलिपॅडपासून सुमारे  20 किमी आधीच त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. त्यादरम्यान हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले आणि कोसळले. 

(नक्की वाचा-  पाकिस्तानला घेरण्यासाठी 7 शिष्टमंडळे तयार; जगाला दहशतवादाविरुद्ध भारत कठोर संदेश देणार)

ऋषिकेश एम्समध्ये रुग्णांना एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. हेच हेलिकॉप्टर एका रुग्णाला आणण्यासाठी केदारनाथला पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यात दोन डॉक्टर आणि एक पायलट उपस्थित होते. सुदैवाने सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत.

(नक्की वाचा-  NIA मोठी कारवाई, पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात दोन दहशतवाद्यांना अटक)

गंगोत्रीजवळ अपघातात 6 जणांचा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच, 8 मे रोजीच गंगोत्री धामला जाणारे हेलिकॉप्टर गंगाणीजवळ कोसळले होते. या घटनेत पाच महिलांसह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतही हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले होते. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com