
एखाद्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास तो किती बळावतो, याचेच एक उदाहरण समोर आले आहे. विदर्भातील गोंदिया येथील एका शल्य चिकित्सकाने सर्जरी करून एका महिलेच्या किडनीमधून तब्बल एक किलो 670 ग्रॅम वजनाचा मुतखडा म्हणजेच किडनी स्टोन बाहेर काढला आहे. ऐवढा मोठा मुतखडा बाहेर काढण्याची ही पहिलीच वेळ असावी असं बोललं जात आहे. या आधी ही अर्धा किलो, एक किलोचे मुतखडे शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात आले आहेत. पण जवळपास दिड किलोचा खडा काढण्याची ही बहूदा पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
52 वर्षीय कृष्णा राजेन्द्र सहारे या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याच्या वारासिवनी परिसरात राहात. त्या मजूरीचं काम करतात. या महिलेला गेल्या सहा वर्षापासून पोट दुखण्याचा त्रास होत होता. मात्र,आर्थिक स्थिती हालाकीची असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्या आपल्या दुखण्याकडे जास्त लक्ष देत नव्हत्या. पोटात दुखू लागलं की त्या वेदनाशामक औषध घेत होत्या. तेवढ्या पुरता त्यांना बरं वाटत होते. हे सतत होत गेलं. त्यामुळे त्यांचा आजार मात्र वाढत होता. त्याची कल्पनाच त्यांना आली नाही.
ट्रेंडिंग बातमी - Bollywood News: 1 करोड फी घेणारी बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री कोण?
महिलेच्या मोठ्या मुलीचे लग्न गोंदिया येथे झाले होते. त्यामुळे कृष्णा या मुलीकडे आल्या होत्या. तेव्हा त्यांना पुन्हा पोटदुखीचा असह्य त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने गोंदिया येथील बी जे हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील लेप्रोस्कोपीक आणि युरो शल्य चिकित्सक डॉ विकास जैन यांच्याकडे आणण्यात आले. त्यांनी एक्स रे मध्ये मोठी आणि भारी मुतखडा असल्याचे सांगितले. त्यासाठी शस्त्रक्रीया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर दोन तास गुंतागुंतीची शस्त्रक्रीया करण्यात आली.
त्यानंतर एक किलो 670 ग्रॅम वजनाचा दगड तिच्या किडनी मधील नलिकेतून बाहेर काढण्यात आला आहे. रुग्ण महिलेच्या स्थितीमध्ये आता बरीच सुधारणा असून एक दोन दिवसात तिची रुग्णालयातून सुट्टी होईल. डॉ जैन यांनी वर्ष 2014 मध्ये अशाच एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून वजनी किडनी स्टोन काढले होते. त्याची लिम्का बुक आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. मात्र यावेळी किडनी स्टोन त्यापेक्षा ही मोठा आणि भारी आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world