
स्त्री 2 च्या यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं आपली फी वाढवल्याची बातमी समोर आली आहे. स्त्री 2 साठी श्रद्धा कपूरने तब्बल 5 कोटी फी घेतली होती. दीपिका पादुकोण,आलिया भट्ट आणि प्रियंका चोपडा सारख्या अभिनेत्रीही कोटीमध्ये आपली फी घेत आहेत. पण तुम्हला माहित आहे का, बॉलिवूडमधल्या कोणत्या अभिनेत्रीने सर्वात पहिले कोटीमध्ये फी घेतली होती? ही लेडी सुपरस्टार त्यावेळी आपल्या सहकलाकारांपेक्षा जास्त फी घेत होती. त्यामुळे इच्छा असून ही केवळ फी जास्त असल्यामुळे त्या अभिनेत्रीला निर्माता- दिग्दर्शन कास्ट करत नव्हते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या अभिनेत्रीने बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. तिचा उल्लेख लेडी सुपरस्टार म्हणून ही केला जात होता. अभिनय आणि सौंदर्य याचा अनोखा मेळ या अभिनेत्रीमध्ये होता. त्यामुळे ती प्रत्येक निर्माता दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटात असावी असं वाटत होतं. ही लेडी सुपरस्टार होती श्रीदेवी. श्रीदेवी ही बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री आहे जीने एक करोड रुपये फी घेतली होती. श्रीदेवीने अनेक बॉलिवूड स्टार बरोबर काम केलं. पण तिने प्रत्येक चित्रपटात आपली वेगळी छाप सोडली होती. अमिताभ बच्चन, अनिल कपूर, शाहरुख खान या स्टारना श्रीदेवीने तेवढीच जोरदार टक्कर दिली होती.
ट्रेंडिंग बातमी - MNS Melava: निकालानंतर सन्नाटा, निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. अखेर राज ठाकरे गरजले!
श्रीदेवीने आपल्या करियरची सुरूवात 'सोलहवां सावन' या चित्रपटापासून केली. 80 च्या दशकात श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांची चलती होती. या दोघांचीच चर्चा बॉलिवूडमध्ये जास्त होती. त्या काळात या दोघांचे चित्रपट तिकीट खिडकीवर हंगामा करत होते. शिवाय त्याच काळात अमिताभ आणि श्रीदेवीची जोडी ही लोकांच्या पसंतीला पडत होती. पण पुढे 1986 साली श्रीदेवीने अमिताभ बच्चन यांच्या बरोबर काम करण्यास जाहीर पणे नकार दिला होता. पण त्यानंतर श्रीदेवीची समजूत काढण्यात आली होती.
ट्रेंडिंग बातमी - Dhule News: अनधिकृत कॅफेत पडद्याआड तरुण-तरुणींचे अश्लील चाळे, पोलीस पोहोचले अन्...
श्रीदेवी ज्या चित्रपटात काम करत त्या चित्रपटात त्या आपल्या अभिनयाची छाप नक्की सोडत. त्यांच्या अभिनयामुळे अनेक वेळा अभिनेता झाकोळून जात होता. अशा स्थिती सलमान खानने ही श्रीदेवी बरोबर काम करण्यात नकार दिला होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे. श्रीदेवीमुळे आपलं काम झाकोळून जाईल असं सलमानला वाटत होतं. त्यामुळेच त्याने काम करण्यास नकार दिला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world