सध्या शाळा-महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे घराघरांमध्ये फिरायला जाण्याचं प्लानिंग केलं जात आहे. सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणी थंड हवेच्या ठिकाणी तर कोणी परदेशात जाण्याचा प्लान आखतात. तर उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारीही मोठ्या प्रमाणात केली जाते. या काळात जंगलातील प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर निघतात. त्यामुळे या काळात वाघ, सिंह किंवा इतर वन्य प्राणी दिसण्याची शक्यता अधिक असते.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुम्ही जर जंगल सफारीचा प्लान करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मेळघाटमध्ये सुरू असलेली जंगल सफारी गेल्या 3 दिवसापासून बंद आहे. शहानूर जंगल आणि नरनाळा किल्ला सफारी 1 मे पासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून जंगल सफारी बंद आहे. त्यामुळे आता जर तुम्ही मेळघाट जंगल सफारीचा प्लान करीत असाल तर तुमचा हिरमोड होऊ शकतो.
नक्की वाचा - Pune News : पुण्यातील प्रसिद्ध मंदिरात अल्पवयीन मुलाचं किळसवाणं कृत्य, CCTV Video पाहून भाविकांचा संताप
मेळघाट जंगल सफारी का आहे बंद?
जिप्सी संघटना चालकांनी भाडेवाढ करण्याच्या मागणीसाठी संप पुकारल्यामुळे मेळघाटातील जंगल सफारी बंद आहे. इंधनाचे दर वाढल्याने शहानुर आणि नरनाळा किल्ला सफारीचे दर वाढवण्याची मागणी जिप्सी संघटनेकडून करण्यात आली आहे. अद्यापही ही मागणी मान्य न केल्याने गेल्या तीन दिवसांपासून मेळघात जंगल सफारी बंद आहे.
महाराष्ट्रात कुठे कुठे होते जंगल सफारी?
महाराष्ट्रात मेळघाटासह ताडोबा आणि पेंच राष्ट्रीय उद्यान जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात असून इथं मोठ्या संख्येने वन्यजीव पाहायला मिळतात. तर नागपुरात पेंच राष्ट्रीय उद्यान आहे. येथेही विविध प्राणी पाहायला मिळतात. भंडारा-गोंदिया या जिल्ह्यात नागझिरा व्याघ्र प्रकल्प, बुलढाण्यात ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्यही जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे.