
पुण्यातील प्रसिद्ध नागेश्वर मंदिरात अल्पवयीन मुलगा शिवलिंगाच्या दिशेने गेला आणि अश्लील कृत्य केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केली आहे. याशिवाय अल्पवयीन आरोपी मुलालाही धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी पौड गावात घडली. या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला असून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतय की, अल्पवयीन मुलगा मंदिराचं पावित्र्य भंग करणारं कृत्य करीत आहे. ज्यानंतर भाविकांनी तातडीने मंदिर संस्थानाला याबाबत माहिती दिली. मंदिर प्रशासनानेही स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तातडीने कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. या आरोपी मुलाचं नाव यापूर्वीही छोट्या-मोठ्या गुन्ह्यात समोर आलं आहे.
नक्की वाचा - Pune Traffic : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सर्वात वर्दळीचा परिसर 'वाहतूक कोंडीमुक्त' होणार!
करारा जवाब मिलेगा! pic.twitter.com/9tq01QZ7JI
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 3, 2025
नागेश्वर मंदिरात पुण्यातील एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. हा व्हिडिओ ट्विट करीत भाजप नेते नितेश राणे यांनीही संताप व्यक्त केला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलाने असं किळसवाणं कृत्य का केलं, याचा तपास केला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world