Mumbai MHADA Lottery: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या २,६४० घरांच्या सोडतीला घरखरेदीदारांकडून थंड प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी म्हाडाने वारंवार अटी-शर्तींमध्ये बदल करूनही अर्जदारांचा उत्साह कमी आहे आहे. त्यामुळेच म्हाडाने आता दुसऱ्यांदा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली असून, २८ मे २०२६ पर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहेत.
India Tanker: करोडो भारतीयांसाठी Good News! 'MV सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, मोठं टेन्शन मिटणार
म्हाडाच्या घराची मुदत वाढवली
याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,६४० घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आता २८ मे २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असला, तरी नियमांत केलेल्या अचानक बदलांमुळे घरांची स्वप्ने पाहणाऱ्या मुंबईकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. विशेषतः पार्किंग आणि घरांच्या आरक्षणाबाबत घेतलेले निर्णय मध्यमवर्गीयांसाठी धक्कादायक ठरले आहेत.
मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी म्हाडाने सुरुवातीला 'मोफत पार्किंग'ची घोषणा केली होती. मात्र, आता हा निर्णय अंशतः मागे घेण्यात आला असून केवळ ६१० सदनिकांसोबतच मोफत पार्किंग मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 'फ्री पार्किंग' मिळेल या आशेवर अनेक नागरिकांनी अर्ज करण्याची तयारी केली होती. मात्र, म्हाडाने आता सरसकट मोफत पार्किंगचा निर्णय रद्द करून तो केवळ ६१० घरांपुरताच मर्यादित ठेवला आहे. उर्वरित २,०३० घरांसाठी ही सुविधा मिळणार नसल्याने ग्राहकांचा उत्साह मावळला आहे.
विक्रोळीतील घरांवरून नाराजी
सोडतीतील सर्वाधिक घरे विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आहेत. येथील १,२२१ घरांपैकी निम्मी घरे आता उच्च उत्पन्न गटासाठी राखीव केल्याने मध्यमवर्गीयांच्या हक्काच्या घरांची संख्या घटली आहे. म्हाडाने किमतीत ७.५ टक्के कपात केली असली, तरी पात्रता निकष आणि वारंवार बदलणाऱ्या नियमांमुळे ग्राहकांनी या सोडतीकडे पाठ फिरवली आहे. पारदर्शकतेचा अभाव आणि नियोजनातील त्रुटींमुळे मुंबईकर आता खाजगी घरांकडे वळत असल्याचे चित्र दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world