जाहिरात

Uday Samant EXCLUSIVE: तीन महिन्यात ब्रेकिंग, 24 तारखेला... उदय सामंतांचा दावोसमधून मोठा गौप्यस्फोट!

एकनाथ शिंदे यांना बाजूला करुन शिवसेनेत आात नवा ‘उदय’ होईल असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या दाव्यावरुन आता उदय सामंत यांनी थेट दावोसमधून रोखठोक उत्तर दिलं आहे.

Uday Samant EXCLUSIVE: तीन महिन्यात ब्रेकिंग, 24 तारखेला... उदय सामंतांचा दावोसमधून मोठा गौप्यस्फोट!

Davos 2025: दावोसमध्ये होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे स्वित्झरर्लंड दौऱ्यावर गेलेत. एकीकडे दावोसमध्ये रेकॉर्डब्रेक करार होत असतानाच राज्यात मात्र उदय सामंत नव्या बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपा आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करुन शिवसेनेत आात नवा ‘उदय' होईल असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या दाव्यावरुन आता उदय सामंत यांनी थेट दावोसमधून रोखठोक उत्तर दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत उदय सामंत? 

'ज्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला उद्योगमंत्री बनवलं.  त्यांच्यामुळे मी आज तिसऱ्यांदा त्यांच्यामुळे दावोसमध्ये आलो आहे. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दरी निर्माण करण्याचा बालिशपणा सुरु आहे. शालेय जिवनात जसा बालिशपणा असायचा तसा ूप्रकार सध्या राज्याच्या राजकारणात सुरु आहे. मात्र मी याकडे लक्ष देत नाही. त्यांचा राजकीय अस्त झाला आहे, त्यांचा राजकीय उदय होण्यासाठीच माझ्या नावाचा वापर होतोय, त्यासाठी त्यांना धन्यवाद दिलं पाहिजे, असा खणखणीत टोला उदय सामंत यांनी लगावला आहे. 

तसेच 'खऱ्या अर्थाने ब्रेकिंग दोन ते तीन महिन्यात मिळेल. काही उबाठाचे आमदार एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्विकारतील.काही खासदारही त्यांचे नेतृत्व स्विकारतील. 24 तारखेपासून मी रत्नागिरीमध्ये याची सुरुवात करतोय, ज्याची प्रचिती तुम्हाला येईल. एकनाथ शिंदे आणि माझ्यामध्ये भावनिक नातं आहे. त्यांच्याशी आम्ही राजकारणापेक्षा भावनांनी जोडलेलो आहोत एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेते आहेत. आम्ही भावनाप्रधान आहोत. मात्र अशाप्रकारे एखाद्याला बदनाम करणे हा मला राजकीय बालिशपणा वाटतो..' असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका, उदय सामंत काय म्हणाले?

काल राज्यामध्ये सहा लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे, आजही पाच सात कोटींची गुंतवणूक होईल, अशा प्रकारे १० ते १२ लाख कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये होईल. सज्जन जिंदाल आणि अनंत अंबानी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे.  हे एक सांघिक यश आहे.  मागच्या दोन वर्षांपासून हा प्रयोग आम्ही केला. आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचाही
उद्योजकांसोबत चांगला संबंध आहे, असं उदय सामंत म्हणाले.

तसेच माननीय अनंत अंबानी आणि जिंदाल यांनी केलेले काम आणि वक्तव्य माझ्यासाठी महत्वाचे आहे. दोन दिवसांपासून झालेल्या बैठका आणि करार हे महाराष्ट्रावर उद्योजकांचे किती प्रेम आहे हे दाखवणारं आहे. काही उद्योग महाराष्ट्रात होत आहेत, त्यामध्येही आम्ही लक्ष घालू कुणालाही पाठिशी घालणार नाही. मात्र कालचा आणि आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही आणलेली गुंतवणूक शाश्वत आहे. येत्या काळात महाराष्ट्र हे उद्योगक्षेत्र होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

नक्की वाचा - Davos 2025: दावोस परिषदेत महाराष्ट्राचा डंका! एका दिवसात 20 मोठे करार, 'इतक्या' कोटींची विक्रमी गुंतवणूक

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी आरबीआयने केलेल्या सर्वेमध्ये एक लाख तेरा कोटींची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये झाली आहे. आजही सर्वाधिक गुंतवणूक ही  महाराष्ट्रामध्ये होत आहे. गेल्या दोन दिवसांपासूनचे दावोसमधील चित्र पाहिले तर महाराष्ट्र हाऊसमोर हाऊसफूल गर्दी आहे.विरोधकांनी टीका करण्यापेक्षा सपोर्ट केलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com