Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यात कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे एक मोठे यश राज्य सरकारला मिळाले आहे. हैदराबाद गॅझेटिअर आणि निजामकालीन ऐतिहासिक कागदपत्रांच्या सखोल तपासणीनंतर राज्यभरात आतापर्यंत 58 लाख 89 हजार 641 मराठा-कुणबी नोंदी शोधण्यात समितीला यश आले आहे. या नोंदींमुळे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचे समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2 कोटींहून अधिक मराठा नागरिकांना होणार फायदा?
समितीने स्पष्ट केले आहे की, शोधलेल्या या 58 लाख नोंदी केवळ वैयक्तिक नसून त्या कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत. नियमानुसार, एका व्यक्तीची कुणबी नोंद सापडल्यास त्याच्या कुटुंबातील सरासरी 4 व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते. या हिशोबाने राज्यातील सुमारे 2 कोटींहून अधिक मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्राचा थेट लाभ मिळू शकतो.
(नक्की वाचा- 'कागदपत्र कसे जळाले नाहीत? 5 जणांचा मृत्यू, सहावा व्यक्ती कुठे?', अजितदादांच्या सर्वात जवळच्या नेत्याला संशय)
अर्ज करण्यात नागरिकांची अनास्था?
एकीकडे नोंदी मोठ्या प्रमाणावर सापडत असताना, दुसरीकडे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण मात्र अत्यंत कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत राज्यभरात केवळ 11 लाख 86 हजार 247 नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. प्राप्त अर्जांपैकी 11 लाख 79 हजार 383 जणांना यशस्वीपणे जात प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली आहेत. नोंदी सापडलेल्या एकूण संख्येच्या तुलनेत अर्ज करणाऱ्यांचे प्रमाण केवळ 5 ते 6 टक्केच आहे.
(नक्की वाचा- Uttar Pradesh News: मोमोजचा 'नाद' नडला! लहान मुलाकडून 85 लाखांचे दागिने लुटले; नेमकं काय घडलं?)
नोंदी सापडूनही नागरिक अर्ज का करत नाहीत, हा आता मोठा प्रश्न बनला आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणी किंवा माहितीचा अभाव यामुळे हे प्रमाण कमी असू शकते. प्रशासनाकडून आता हे प्रमाणपत्र वाटप अधिक वेगाने करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world