Hindi Controversy: 'मराठी'वरुन दहशतवाद्यांशी तुलना, आशिष शेलारांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार

Maharshtra Marathi Hindi Language Controversy:  पहलगाम दहशतवाद्यांनी हल्ला केला तो धर्म विचारून आणि मुंबईत भाषा विचारून मनसैनिक हल्ले करत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी मनसे नेत्यांवर निशाणा साधला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रातियांना चोप देण्याचा इशारा देत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या या भूमिकेवरुन आशिष शेलार यांनी त्यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना केली आहे.  पहलगाम दहशतवाद्यांनी हल्ला केला तो धर्म विचारून आणि मुंबईत भाषा विचारून मनसैनिक हल्ले करत आहेत. दोन्हीही घटना चीड आणणाऱ्या आहेत. महायुतीत आम्ही मोठा भाऊ आहोत भाजप संयमाने घेत आहेत तोपर्यंत नीट वागा अशी तंबी देखील त्यांनी मनसैनिकांना दिली आहे, आशिष शेलार यांच्या या वक्तव्याचा आता मनसे नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

मराठी भाषेचा मुद्दा, छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख; शिंदेंच्या आमदाराच्या विधानाने वाद पेटणार

राजू पाटील यांच्याकडून आशिष शेलार यांच्या वक्तव्यांचा निषेध

कालच्या मराठी माणसांच्या मेळाव्यात मराठी माणूस एकवटलेला बघून मतांच्या लाचारीसाठी मराठीचा दुस्वास करणाऱ्या महाराष्ट्रद्रोही विरोधकांच्या बुडाला आग लागली आहे. मराठी भाषेसाठीचा अट्टाहास हा हिंदूत्व विरोधी आहे असा दळभद्री व महाराष्ट्रद्रोही गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न आशिष शेलारांनी केला. यापुढेही हे मराठी भैय्ये असे अनेक प्रकार करणार.आज मराठी माणसाची तुलना ह्यांनी पहलगाम मध्ये २०० किमी दूर असलेल्या पाकिस्तानातून आपल्या देशात घुसून पर्यटकांची हत्या करून पुन्हा आरामात आपल्या अड्ड्यांवर परतलेल्या अतिरेक्यांशी केली आहे. हा आपल्या भाषेसाठी कडवट भुमिका घेणाऱ्या मराठी माणसाचा अपमान आहे. आम्ही हिंदू आहेत पण हिंदी नाही. शेलारांच्या या मराठीद्वेशी वक्तव्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.

Advertisement

( नक्की वाचा: मनसे-शिवसेना युती होणार? राज-उद्धव यांच्या भाषणातील 'त्या' वक्तव्यांवरून स्पष्ट संकेत )

गजानन काळेंची टीका...

 मराठी माणसांच्या मेळाव्यात मराठी माणूस एकवटलेला बघून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पोठशूळ उठले आहे. मराठी आणि महाराष्ट्र सोडून हा म महापालिकेच्या निवडणुकीचा असल्याचा जावईशोध भाजप नेत्यांनी लावला आहे. सिंचन घोटाळ्यातील भुजबळांना स्वतःच्या पक्षात आणलं, सलीम कुत्तासोबत नाचलेल्याला पक्षात आणून शुद्धीकरण केलं, तेव्हा स सत्तेचा नसतो का? असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.