जाहिरात

Raj Thackeray Uddhav Thackeray News: मनसे-शिवसेना युती होणार? राज-उद्धव यांच्या भाषणातील 'त्या' वक्तव्यांवरून स्पष्ट संकेत

राज आणि उद्धव यांनी भाषणात अशी अनेक वक्तव्य केली, ज्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची राजकीय युती होणार, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

Raj Thackeray Uddhav Thackeray News: मनसे-शिवसेना युती होणार? राज-उद्धव यांच्या भाषणातील 'त्या' वक्तव्यांवरून स्पष्ट संकेत

Raj Thackeray Uddhav Thackeray Speech : मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा आज पार पडला. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव निवडणुका एकत्र लढणार का? असा प्रश्ना पडाला आहे. याचं उत्तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून मिळालं आहे. राज आणि उद्धव यांनी भाषणात अशी अनेक वक्तव्य केली, ज्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची राजकीय युती होणार, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "आजच्या भाषणाची घोषणा झाल्यानंतर सगळ्यांचं लक्ष आमच्या भाषणाकडे आहे. मात्र आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. आम्ही आता एकत्र आलो आहोत, ते एकत्र राहण्यासाठी." 

(नक्की वाचा-  Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 'आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला'; उद्धव ठाकरेंचाही फडणवीसांवर निशाणा)

पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "मधल्या काळात मी आणि राज आपण सगळ्यांनी या नतद्रष्ट्यांचा अनुभव घेतलाय. वापरायचं आणि फेकायचं. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार आहोत."

"तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे. ते म्हणतात शिवसेनेने आजवर काय केलं ? राज मी तुला सोबत घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र आलो आहोत", असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

(नक्की वाचा- Raj Uddhav Thackeray Alliance : 'तुमची सत्ता विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर'; राज ठाकरे कडाडले )

राज ठाकरे यांच्या भाषषातील वक्तव्ये

"राज ठाकरे भाषणाच्या शेवटी शिवसेना-मनसे युतीचे संकेत दिले आहेत. सगळ्या युत्या आघाड्या होत राहतील. महाराष्ट्र मराठी माणूस यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही. पुढे काय गोष्टी घडतील याची कल्पना नाही. मात्र मराठीसाठीची एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रात बाळासाहेबांचे स्वप्न पुन्हा साकारावे, अशी आशा अपेक्षा व्यक्त करतो", असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com