महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा गुरुवारी मुंबईमध्ये पार पडला. विधानसभा निवडणुकांनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित केली होती. याचे उदाहरण देताना त्यांनी मनसेचे पराभूत आमदार राजू पाटील यांच्या गावामध्येच त्यांना शून्य मतदान झाल्याचा दावा केला होता. मात्र आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा हा दावा खोडून काढला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते राज ठाकरे?
मनसेच्या मुंबईमधील मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी राजू पाटील यांच्या मतदारसंघाचा उल्लेख केला होता. राजू पाटील यांचं एक गाव आहे. पाटलांचेच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होतं. 1400 लोक त्या गावात राहतात. मात्र त्या गावातून राजू पाटील यांना एकही मत मिळालं नाही, असं ते म्हणाले होते. आता राज ठाकरेंचा हा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने खोडून काढला आहे.
कल्याणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेला कुठे ही शून्य मतदान नाही. राजू पाटील यांच्या गावात मनसेला आघाडी आहे. पराभव कसा झाला? याची चर्चा केली पाहिजे उगाच कोणीतरी राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली आहे, असं त्यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा - Crime news: हत्या की आणखी काही? 32 वर्षाय विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, आता...
दरम्यान, मनसेच्या या मेळाव्यामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी विविध मुद्दे विधानसभा निवडणूक निकाल संशयास्पद असल्याचा दावा केला. मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. लोकांनी आपल्याला केलेलं मतदान कुठेतरी गायब झालंय. अशा प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढलेल्या बऱ्या.. असे मोठे विधानही त्यांनी यावेळी केले.