
मुंबई: मनसेच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर मीरा भाईंदरमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता. मात्र पहाटे तीन वाजताच पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या दडपशाहीनंतरही मनसे नेते मोर्चावर ठाम असून मीरारोड परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आता या मोर्चामध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकही सहभागी होणार आहेत.
MNS Morcha News: 'मराठी'साठी एल्गार! मनसेचे पुन्हा खळखट्ट्याक; राज्यभरातून मनसैनिक मुंबईत धडकणार
मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना शिंदे गटाने मौन बाळगले असतानाच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मनसेच्या मोर्चावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलिसांनी मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? असा सवाल करत मी स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
काय म्हणाले प्रताप सरनाईक?
"ज्या पद्धतीने मीरा भाईंदरमध्ये पोलिसांची कारवाई सुरु आहे, ती योग्य नाही. मराठी भाषिकांनी जर शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती ती त्यांना द्यायला पाहिजे होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी चालू केली आहे ती त्या परिसरातील आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही," असा इशारा मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
MNS Protest: "मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली?" CM फडणवीस यांचा पोलिसांवर संताप
"आज सकाळपासून जी धरपकड मराठी माणसांची आणि कार्यकर्त्यांची सुरु आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांकडेही निषेध नोंदवतो. आता मी स्वत: त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मीरा- भाईंदरकडे निघालो आहे. पोलिसांची हिंमत असेल तर त्यांनी प्रताप सरनाईकला अटक करुन दाखवावी," अशी थेट भूमिका प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world