
मुंबई: मराठी- हिंदी वाद आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा- भाईंदरमध्ये निषेध पदयात्रा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र मोर्चा काढण्या अगोदरच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. आज पहाटेच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र तरीही हा मोर्चा काढणार असल्याचे मनसेने सांगितलं आहे.
Uddhav Thackeray: 'तुम्हाला कोण ओळखतं, तुमची लायकी तर...', ठाकरेंनी दुबेंना शिवसेना स्टाईल ठोकलं
समोर आलेल्या माहितीनुसार,आज 10 वाजता बालाजी रोड ते मीरा रोड स्टेशनपर्यंत निघणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज निषेध पदयात्रा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला मनसे सोबत, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, मराठी एकीकरण समिती तसेच समविचारी संस्था, संघटना मधील गराठी भाषिक यांनी पाठींबा दिलेला आहे.
मात्र मोर्चा काढण्या अगोदरच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. आज 10 वाजता बालाजी रोड ते मीरा रोड स्टेशनपर्यंत निघणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. शिवाय या मोर्चाच्या पार्शवभूमीवर मीरारोड स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच कालपासूनच महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना पोलिसांकडून नोटीसी बजावल्या जात आहेत.
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. मला सरकारचे कळत नाही, गुजराती लोकांच्या मोर्चाला परवानगी मिळते पण महाराष्ट्रात मराठी माणसाच्या मोर्चाला परवानगी मिळत नाही. हा महाराष्ट्र आहे की गुजरात ते समजत नाही. सरकारचा दहशतवाद आहे. ह्या पुर्वी भाजपाने आणिबाणी साजरी केला मात्र हा सरकारचा दहशतवाद आहे. बिहार निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र अशांत केला जातोय, असा घणाघात त्यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world