Maharashtra Rain Update: काय सांगता!धो धो पडणाऱ्या पावसाचा जोर मंदावणार,'या' तारखेपासून Monsoon घेणार निरोप

Maharashtra Rain Update : ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Maharashtra Rain latest Update

Maharashtra Rain Latest Update : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्येही जोरदार बॅटिंग केली. जून महिन्यातही पावसाने दमदार हजेरी लावली. पण 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यभरात मुसळधार पाऊस पडल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाचा जोर मंदावला. परंतु, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस याच पावसाने रौद्ररुप धारण केलं आणि मराठवाड्यासह कोकण विभागालाही झोडपलं. दरम्यान, ऑक्टोबर महिना सुरु झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण 8 ऑक्टोबरपासून राज्यातून मान्सून निरोप घेणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात कोणत्या ठिकाणी पडणार पाऊस?

मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहणार आहे. मात्र, 2 ते 7 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार आहे.पण विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार, अशी शक्यताही वर्तवण्यात आलीय.याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठं आवाहन करण्यात आलं आहे. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावी,असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल आणि सुमारे 8 ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल, अशी शक्यता आहे. 

नक्की वाचा >> शिंदे-ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ धडाडणार!राज्यात होणार 5 दसरा मेळावे, कुठे पाहाल?

गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात धो धो पाऊस कोसळला होता.पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, वाशिम, नाशिक, ठाणे,रायगडसह मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातला होता. अनेक जिल्ह्यात रस्त्यांवर सखल भागात पाणी साचलं होतं आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तसच काही ठिकाणी वीजेचा लपंडावही सुरु होता.

तर राज्यातील काही धरणे तुडुंब भरल्याने नद्यांना पूर आला होता. परभणी जिल्ह्यातही पावसाचा हाहा:कार सुरु होता. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. या धरणातून 56060.53 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता आणि आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. 

Advertisement

नक्की वाचा >> Dhule Crime : मुलगी रडत रडत घरी आली अन् कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली! नराधम काकाने पुतणीसोबत केलं सर्वात भयंकर कृत्य