अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी काल 15 जुलै रोजी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीमागे तिसरी आघाडीचं प्रकरण असल्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांची भेट (MP Sunetra Pawar visited Moti Bagh) घेतल्यानंतर त्यांनीच पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करताना शरद पवारांनाच अडकवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं.
काल छगन भुजबळांनंतर आज खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदी बाग येथे शरद पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत. या भेटीमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. यावेळी निवासस्थानी सुप्रिया सुळेही असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये काय बातचीत होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. मोदी बागेत शरद पवार (Sharad Pawar Meets) यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवार पोहोचल्या आहेत. ते बाहेर आल्यानंतर भेटीमागील नेमकं कारण कळू शकेल.
नक्की वाचा - 'इचलकरंजी म्हणजे पाक व्याप्त काश्मीर' पाटील हे काय बोलले?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी सुनेत्रा पवार यांच्या मोदीबागेतील दौऱ्याबाबत खुलासा केला आहे. सुनित्रा पवार याच्या बहीण मोदी बाग येथे वेगळ्या विंगमध्ये राहतात. त्या बहिणीला भेटायला गेल्या आहेत. विनाकारण गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती दिली.