Ladki Bahin Yojana Diwali Bonus : महायुती सरकारनं राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे हा योजनेचा उद्देश आहे. या योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार आहे. राखी पौर्णिमेच्यापूर्वी या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला. आत्तापर्यंत तीन हप्ते DBT च्या माध्यमातून खात्यात जमा झाले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत यापूर्वी 30 सप्टेंबर 2024 होती. ती वाढवून 15 ऑक्टोबर 2024 करण्यात आली. त्यामुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला. अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात 3000 रुपयांचा बोनस जमा होणार आहे. त्याचबरोबर काही निवडक महिला आणि तरुणींना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही मिळणार आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
5500 रुपये अतिरिक्त जमा होणार
'इकॉनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिवाळीच्या निमित्तानं लाडकी बहीण योजनेंतर्गंत लाभार्थ्यांना 3000 रुपयांचा बोनस जारी करण्यात आला आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1500 रुपयांव्यतिरिक्त अतिरिक्त असणार आहे. या व्यतिरिक्त 2500 रुपयांना अतिरिक्त रक्कमदेखील खात्यात जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या खात्यात 5500 रुपयांची रक्कम जमा होईल.
दिवाळी बोनस मिळवण्यासाठी पात्र अटी काय आहेत ते पाहूया
- महिलेचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत हवं
- योजनेचा लाभ कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतला असेल
- महिलांचे अधार कार्ड आणि बँक खाते लिंक हवे.
या अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
( नक्की वाचा : 'लाडक्या बहिणीं'ना मिळणार पूर्ण पैसे, राज्य सरकारची बँकाना मोठी सूचना )
कोणत्या महिलांना अतिरिक्त 2500 रुपये मिळणार?
3000 रुपयांच्या बोनसशिवाय काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. हा अतिरिक्त लाभ या महिला वर्गासाठी उपलब्ध आहे.
- दिव्यांग महिला
- एकल माता
- बेरोजगार महिला
- दारिद्ररेषेखालील महिला
- आदिवासी भागातील महिला
या महिलांना एकूण 5500 रुपये (3000+2500) चा लाभ मिळणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world