जाहिरात

Accident News: मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पतीही गंभीर; 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात

मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.

Accident News: मर्सिडीजच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पतीही गंभीर; 19 वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबई: नवी मुंबईच्या खारघरमधून एक हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 19 वर्षीय इंजिनियअर तरुणीने मर्सिडीज कारने एका दांपत्याला उडवले. या अपघातात नवी मुंबईतील विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थिनीला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावरील सुरक्षेसाठी यंदा एआयची नजर, सुरक्षेसाठी मंदिराच्या बाहेर पडण्याचा मार्गही बदलला

समोर आलेल्या माहितीनुसार,  खारघरमध्ये बुधवारी सायंकाळी 7 वाजता गोपाल यादव आणि रेखा हे दोघे पती-पत्नी स्कूटरवरुन नवीन पनवेल येथे परत येत असताना अपघात झाला होता.बेलापूर वरून पनवेलच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या मर्सिडीज बेंझ कारने पुढे जाणाऱ्या स्कूटरला धडक दिली. या अपघातात स्कूटरवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर स्कूटर चालवणारा तिचा पती गंभीर जखमी झाला.

ही घटना बुधवारी रात्री नवी मुंबईतील शीव-पनवेल मार्गावर खारघर परिसरातील हिरानंदानी ब्रिजजवळ घडली असून खारघर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या 19 वर्षीय मर्सिडीज कार चालक तरुणीला ताब्यात घेतले आहे. तीर्था सिंग असे तिचे नाव असून ती नवीन पनवेल भागातील रहिवासी आहे. ती इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताला जबाबदार असलेली मर्सिडीज कार चालवणारी 19 वर्षीय इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी तीर्था सिंह हिला खारघर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुढील तपास खारघर पोलीस करीत आहेत.

Pune Palkhi 2025 : पालखी मार्गावर सर्व सोयीसुविधा; पुणे जिल्हा परिषदेकडून स्पेशल APP लॉन्च

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com