जाहिरात

Mumbai-Amravati Express accident : लोकेशन चुकलं, मुंबई-अमरावती एक्सप्रेस अन् ट्रकची धडक; नेमकं काय घडलं?

अपघातग्रस्त ट्रक रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकला होता, त्यामुळे गॅस कटरच्या मदतीने ट्रक कापून बाहेर काढण्यात आला.  

Mumbai-Amravati Express accident : लोकेशन चुकलं, मुंबई-अमरावती एक्सप्रेस अन् ट्रकची धडक; नेमकं काय घडलं?

Rail Accident : बोदवड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या मुंबई-अमरावती एक्स्प्रेस आणि ट्रक अपघाताची मोठी अपडेट समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास एक्स्प्रेसने ट्रकला धडक दिली होती. ट्रक चालक वेळेत बाहेर पडल्याने तो बचावला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, GPS लोकेशन चुकल्यामुळे ट्रक चालकाने बंद असलेल्या क्रॉसिंगच्या रस्त्याने प्रवेश केल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. त्याशिवाय अंधार आल्याने ट्रक चालकाला अंदाज आला नाही. रेल्वे क्रॉसिंग तोडून रेल्वे ट्रक थेट रेल्वे लाईन वर अडकल्याने व ट्रक मागेपुढे काढता येत नसल्याने ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढल्याची प्रशासनाची माहिती आहे. रेल्वे ट्रॅकवर ट्रक अडकल्याने मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसने ट्रकला धडक दिली आणि हा अपघात झाला असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी या अपघाताबाबत माहिती दिली. 

Holi 2025 : होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना

नक्की वाचा - Holi 2025 : होळीसाठी लाकडं शोधायला गेले अन् हातात महिलेचं कापलेलं शीर; मुंबईजवळील धडकी भरवणारी घटना

जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातामुळे मुंबई-नागपूर रेल्वे मार्गावरील काही गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या. आता हळूहळू हा मार्ग सुरळीत करण्याचे काम सेंट्रल रेल्वेच्या वतीने सुरू आहे.  मुंबई-अमरावती एक्सप्रेसने धान्याने भरलेल्या ट्रकला धडक दिली होती. त्या गाडीला दुसरे इंजिन लावून पुढे नेण्यात आले असून ती आता अकोल्यापर्यंत पोहोचली आहे. अपघातग्रस्त ट्रक रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकला होता, त्यामुळे गॅस कटरच्या मदतीने ट्रक कापून बाहेर काढण्यात आला.  

या अपघातामुळे सेंट्रल रेल्वेने काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळविल्या आहेत. खंडवा-इटारसी-नागपूर मार्गे या गाड्या वळवण्यात आल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने दिली आहे.  बोदवड रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याने भरलेला ट्रक रेल्वे रुळांवर आला होता. पहाटे साडेपाच वाजता मुंबई-अमरावती एक्सप्रेसने त्या ट्रकला धडक दिली. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.