Mumbai Crime: खळबळजनक! काँग्रेस नगरसेविकेकडून महिलेचे अपहरण, अनैतिक संबधाच्या संशयातून कृत्य

आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एका ५६ वर्षीय महिला फॅशन डिझायनरने हे गंभीर आरोप केले आहेत. भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

विशाल पाटील, मुंबई:

Mumbai Crime:  मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. पतीशी असलेल्या संबंधांच्या संशयातून भांडुप प्रभाग क्रमांक ११० च्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि चालकाविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात अपहरण, जबरदस्तीने डांबून ठेवणे, मारहाण आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी असलेल्या आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर एका ५६ वर्षीय महिला फॅशन डिझायनरने हे गंभीर आरोप केले आहेत. भांडुप पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

पोलिसांत दाखल झालेल्या एफआयआरनुसार, तक्रारदार महिला २०१० पासून भांडुप पश्चिम भागात आपल्या दोन मुलींसह राहते. २०२० मध्ये काँग्रेस नेते सुरेश कोपरकर (वय ७५) यांच्याशी निवडणूक प्रचारादरम्यान तिची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक आणि व्यावसायिक कारणांमुळे फोनवर बोलणे आणि भेटीगाठी सुरू होत्या. कोरोना काळातही त्यांनी एकत्र सामाजिक काम केले होते. मात्र, या संबंधांवरून सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर आणि मुलगी अक्षता यांनी २०२२ मध्ये तक्रारदार महिलेला फोन करून शिवीगाळ केली होती.

Advertisement

 ५ मे २०२६ रोजी दुपारी आशा कोपरकर यांच्या मुली अक्षता आणि मनस्वी, जावई कुणाल भोईर आणि चालक रहमान हे तिच्या घरात घुसले. त्यांनी घरात असलेल्या लहान मुलीला अश्लील शिवीगाळ करत धमकावले आणि जबरदस्तीने तक्रारदार महिलेला लिफ्टमधून ओढत नेत इनोव्हा कारमध्ये बसवले. तिथून तिचे अपहरण करून तिला विलेज रोड, भांडुप येथील सुरेश कोपरकर यांच्या कार्यालयात नेण्यात आले. ​कार्यालयात नेल्यानंतर अक्षता, मनस्वी, कुणाल भोईर आणि सर्वेश कोपरकर यांनी महिलेचे दोन्ही मोबाईल हिसकावून घेतले आणि तिची तपासणी केली. 

Pandharpur News: विठुरायाच्या मंदिरात दर्शनाचा काळाबाजार! ऑडियो क्लीपने खळबळ; थेट UPIद्वारे वसुली

धमकी, अपहरण.. मारहाण

इतकेच नव्हे तर, महिलेच्या मदतीला धावून आलेल्या रसल फर्नांडिस नावाच्या तरुणालाही कार्यालयात बोलावून कुणाल आणि सर्वेश यांनी गचांडी धरून बेदम मारहाण केली. यावेळी माजी नगरसेविका आशा कोपरकर यांनी महिलेला आणि तिच्या मुलींना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन पैशांवरून आणि चारित्र्यावरून टोमणे मारत मानसिक त्रास दिला, तसेच "आम्ही आगरी कोळी आहोत, आम्ही कापून टाकू," अशी धमकी दिल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, १२ मे रोजी सुरेश कोपरकर यांच्या असिस्टंटने फोन करून महिलेला तिची इनोव्हा कार (MH 05 EL 4230) कार्यालयात जमा करण्यास भाग पाडले. १४ मे रोजी तिला पुन्हा कार्यालयात बोलावून कारचे ट्रान्सफर पेपर आणि मालमत्ता नावावर करण्यासाठी सही करण्याची जबरदस्ती करण्यात आली. सही न केल्यास कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली. 

अखेर या सततच्या त्रासाला आणि जीवाच्या भीतीला कंटाळून पीडित महिलेने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरसेविका आशा कोपरकर, कुणाल भोईर, सर्वेश कोपरकर, अक्षता कोपरकर, मनस्वी कोपरकर आणि चालक रहमान यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस निरीक्षक सविता नारायण जाधव या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Nashik News: कृपया लक्ष द्या! नाशिकच्या गोदाघाट परिसरातील घाटावर नागरिकांना नो एन्ट्री, किती महिने राहणार बंद?