
18 डिसेंबरला मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठा अपघात झाला. नौदलाच्या एका स्पीड बोटीने प्रवाशांनी भरलेल्या बोटीला धडक दिली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात स्टीयरिंग असेंब्ली आणि बोटीचा वेग नियंत्रित करणाऱ्या थ्रॉटल क्वाड्रंटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे झाला असावा. धडक दिली त्यावेळी नौदलाची बोट स्पीडमध्ये होती.
नक्की वाचा - Safer Car : सुरक्षित कार पुरेशी असते का? कंपनीचे CEO आणि अख्खं कुटुंब संपलं, अनेक सवाल उपस्थित!
नौदलाची बोट ही एक रिजिड हल इन्फ्लेटेबल बोट (RHIB) आहे. या बोटीच्या इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. चाचणी सुरू असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि नीलकमल या पर्यटक बोटीला धडकली. 100 हून अधिक प्रवाशांना घेऊन ही फेरी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटाकडे जात होती. एलिफंटा हे मुंबईतील एक प्रसिद्ध पर्यटन असून येथील लेण्या पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
धडक लागल्यामुळे बोट समुद्रात बुडाली. घटनेनंतर तटरक्षक बोटींसह नौदलाचे हेलिकॉप्टर आणि बोटींकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. दोन्ही बोटींवर मिळून 113 जणं होतं. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यातून 98 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्डच्या रेकॉर्डनुसार, नीलकमलला अधिकांश 84 प्रवासी आणि सहा चालक दलाच्या सदस्यांना घेऊन जाण्याचा परवाना दिला होता. धडकेच्या वेळी बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. एमएमबीने बोटीचा परवाना रद्द केला आहे आणि या प्रकरणात तपास सुरू केला आहे. नौदलाच्या चालकाविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिताअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात निष्काळजीपणा, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात टाकणे यांसारखे आरोप आहेत. नौदलाची बोट सध्या नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world