
Saqib Nachan Death in Jail: मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी ईसीस दहशतवादी संघटनेचा म्होरक्या साकीब नाचन याचा जेलमध्ये मृत्यू झाला आहे. रात्री ब्रेन हॅमरेज झाले म्हणून साकीब नाचन याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्याला दिल्लीच्या दीनदयाळ रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. साकीबच्या मृत्यूनंतर ठाणे रुरल पोलिसांचा मोठा बंदोबस्त पडघा गावाच्या बाहेर लावण्यात आलेला आहे.
साकिब नाचन याला 1990च्या दशकातल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी ‘टाडा' न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. पाच वर्षे तुरुंगात राहिल्यावर नाचणची सुटका झाली. पुन्हा 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी साकिबला अटक झाली. त्यावेळी तो ठाणे कारागृहात होता. नाचण याची वर्तणूक चांगली असल्यानं त्याची पाच महिने 13 दिवस आधीच सुटका केली होती. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्यातील पडघा येथे दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणाच्या संदर्भात छापे टाकले होते. यावेळी नाचन याला अटक करण्यात आली होती.
कोण आहे साकीब नाचन? (Who Is Saqib Nachan)
साकिब नाचनवर दहशतवादी संघटना ISIS आणि SIMI शी संबंध असल्याचा आरोप आहे. साकिब नाचन यांना 2002 आणि 2003 मध्ये मुंबईतील घाटकोपर, विले पार्ले आणि मुलुंड रेल्वे स्थानकांवरील बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये मुख्य आरोपी म्हणून दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणी त्याला POTA अंतर्गत 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. 2017 मध्ये त्याची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याची सुटका झाली होती.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) साकिब नाचन याला 2023 मध्ये पुन्हा अटक केली. त्यांच्यासह 15 जणांना ISIS मॉड्यूल प्रकरणात अटक करण्यात आली, ज्यात त्यांचा मुलगा शमील नाचन आणि भाऊ आकिब नाचन यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र ATS आणि पोलिसांनी साकिब नाचन याच्या बोरीवली-पडघा येथील घरी छापेमारी केली. सुमारे 300 पोलिसांनी 20 ठिकाणांवर छापे मारले होते.
त्याच्यावर देशभरातील तरुणांना पडघा गावात आणून दहशतवादी प्रशिक्षण देण्याची योजना आखल्याचा आरोप होता. साकिब नाचनने ठाण्यातील पडघा गावाला 'अल-शाम' म्हणजेच इस्लामिक शरिया कायद्याने स्वतंत्र क्षेत्र घोषित केल्याचा देखील आरोप होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world