जाहिरात

Iran America News : अमेरिकेवर पलटवार, इराणने कतारमधील अमेरिकेच्या एअर बेसवर दागली क्षेपणास्त्र

इराणने सोमवारी रात्री उशीरा कतारमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र दागल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यापूर्वी कतारने आपली एअरस्पेस बंद केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Iran America News : अमेरिकेवर पलटवार, इराणने कतारमधील अमेरिकेच्या एअर बेसवर दागली क्षेपणास्त्र

इराणने सोमवारी रात्री उशीरा कतारमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र दागल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यापूर्वी कतारने आपली एअरस्पेस बंद केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रविवारी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तरात अमेरिकेवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. क्यूडीएस न्यूजनुसार, इराणने केलेले हल्ले दोहामध्ये झाले आहेत. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात घोषणा केली होती. हल्ल्यांपूर्वी त्यांनी आपले नागरिक, निवासी आणि प्रवासांच्या सुरक्षेसाठी हवाई क्षेत्रातातील वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.

इराणने दिली होती धमकी...

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, इराणने अमेरिकन तळांवर १० क्षेपणास्त्रांनी हल्ला केला आहे. इराणच्या सरकारी टीव्हीनेही याची पुष्टी केली आहे. इराणने कतारमध्ये एक अमेरिकी तळाविरोधात अभियान सुरू केला आहे. इराणवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणकडून अमेरिकन सुविधांना लक्ष्य करण्याची शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांनी आधीच व्यक्त केली होती. मात्र अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला असल्याचं इराणने म्हटलं आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com