जाहिरात

Special Trains: मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! दिवाळी, छठसाठी धावणार स्पेशल एसी ट्रेन, कधी आणि कुठे? वाचा डिटेल्स

Central Railway  Special Trains For Diwali Chhath Puja: सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. 

Special Trains: मध्य रेल्वेचा मेगाप्लॅन! दिवाळी, छठसाठी धावणार स्पेशल एसी ट्रेन, कधी आणि कुठे? वाचा डिटेल्स

 Special Trains For Diwali Chhath Puja: देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीचा सण आता संपला तरीही नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेकजण दिवाळीनिमित्त बाहेर फिरण्याचा प्लॅन करत आहेत. अशातच आता दिवाळी (Diwali) आणि छठ (Chhath) सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. 

दिवाळी आणि छठ पुजेमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) मुंबई आणि नागपूर (Nagpur) दरम्यान अतिरिक्त 'एसी सुपरफास्ट विशेष' (AC Superfast Special) गाड्या चालवण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. कोणत्या आहेत त्या ट्रेन आणि कधी सुटतील? वाचा सविस्तर...

मध्य रेल्वेवर 9 दिवस मेगाब्लॉक! लोकलच्या वेळेत बदल, लगेच तपासा वेळापत्रक

विशेष गाड्यांचे वेळापत्रक:

०१००५ सीएसएमटी-नागपूर एसी सुपरफास्ट: ही विशेष गाडी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी मध्यरात्री ००.२० वाजता (रात्री १२ वाजून २० मिनिटांनी) सीएसएमटी, मुंबईहून सुटेल. ती त्याच दिवशी संध्याकाळी १५.३० वाजता (दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी) नागपूर येथे पोहोचेल.

०१००६ नागपूर-सीएसएमटी एसी सुपरफास्ट विशेष: नागपूरहून ही विशेष गाडी २५ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळी १८.१० वाजता (०६ वाजून १० मिनिटांनी) सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.२५ वाजता सीएसएमटी, मुंबई येथे पोहोचेल.

थांबे आणि रचना (Structure): या विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबतील. या गाड्यांच्या रचनेत २० वातानुकूलित (AC) थ्री-टिअर (3-Tier) डबे आणि २ जनरेटर कार (Generator Cars) असणार आहेत.

( नक्की वाचा : Mumbai Metro3: फक्त 1 'Hi' आणि तिकीट हातात! मुंबई मेट्रोचं WhatsApp वर मिळणार तिकीट, वाचा संपूर्ण पद्धत )

दरम्यान,  या विशेष गाड्यांसाठीची आरक्षण (Booking) प्रक्रिया सर्व कम्प्युटरीकृत आरक्षण केंद्रे (Computerized Reservation Centers) आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू झाली आहे. या विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी किंवा एनटीईएस (NTES) ॲप डाऊनलोड करावे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com