जाहिरात

Chembur News: चेंबुरमध्ये मोठी दुर्घटना! 8 व्या मजल्यावरुन 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू

जखमी कामगारांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याचीही माहिती समोर आली आहे.

Chembur News: चेंबुरमध्ये मोठी दुर्घटना! 8 व्या मजल्यावरुन 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू

Chembur News:  मुंबईच्या चेंबुरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबुरमध्ये एका इमारतीचे काम सुरु असताना आठव्या मजल्यावरुन सहा कामगार पडल्याची घटना घडली आहे. या कामगारांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर बाकीचे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या कामगारांनी सेफ्टी किट न वापरल्याचीही माहिती समोर आली आहे.

चेंबुरमध्ये मोठी दुर्घटना

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चेंबूरच्या सुभाष नगर परिसरात एका निर्माणाधीन इमारतीवरुन  पडल्याने झालेल्या भीषण अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.  सुभाष नगरमधील इमारत क्रमांक ३६ चे बांधकाम सुरू असताना सहाव्या आणि आठव्या मजल्यावर विटांचे काम सुरू होते. 

Mumbai Pune Highway: मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार! 12 हजार कोटींचा मेगाप्लॅन तयार

एका कामगाराचा मृत्यू, 5 जखमी

यावेळी अचानक सहा कामगार खाली कोसळले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ धाव घेत जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, ५५ वर्षीय रामालू यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. ​या अपघातात गुणाधर राय (२२) याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (MICU) उपचार सुरू आहेत. 

इतर जखमींमध्ये उसराय (३०), रमेश राय (२५), विजय (३५) आणि संदीप (२७) यांचा समावेश आहे. या कामगारांनी कामाच्या ठिकाणी हेल्मेट किंवा सेफ्टी बेल्ट वापरले नव्हते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.

Rohit Pawar: "खूप वेदनादायी", अजित पवारांसाठी रोहित पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट, व्हॉट्सअप कॉल केला अन्..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com