जाहिरात

Mumbai Pune Highway: मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार! 12 हजार कोटींचा मेगाप्लॅन तयार

ही कोंडी सोडवण्यासाठी नवा प्लॅन तयार करण्यात आला असून उरण -कर्जत -शिरूर महामार्ग तयार करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Mumbai Pune Highway: मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार! 12 हजार कोटींचा मेगाप्लॅन तयार

Uran Karjat Shirur Highway :  मुंबई पुणे एक्सप्रेसवर टँकर उलटल्याने संपूर्ण महामार्ग ठप्प झाला अन् वाहतुकीचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. तब्बल 32 तास महामार्गावरील वाहतूक थांबल्याने वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. या वाहतुक कोंडीनंतर मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करताना वारंवार येणारी ट्रॅफिकची समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला असून अखेर आता सरकारला जाग आली आहे.

मुंबई- पुणे महामार्गावरील कोंडी फुटणार!

मुंबई पुणे महामार्गावर होणाऱ्या वाहतुक कोंडीचा मुद्दा राज्याच्या अधिवेशनातही चांगलाच गाजला. माजी मंत्री जयंत पाटील आणि इतर आमदारांनीही वाहतुक कोंडीचा  मुद्दा उचलत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.  पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ३२ तासांची वाहतुक कोंडी झाल्यानंतर अखेर आता सरकारला जाग आली आहे.  ही कोंडी सोडवण्यासाठी नवा प्लॅन तयार करण्यात आला असून उरण -कर्जत -शिरूर महामार्ग तयार करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

Rohit Pawar: "खूप वेदनादायी", अजित पवारांसाठी रोहित पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट, व्हॉट्सअप कॉल केला अन्..

उरण -कर्जत -शिरूर महामार्ग प्रकल्पामुळे  मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव मंत्रालयात धुळ खात पडला होता. अखेर राज्य सरकार कडून  बीओटी तत्वावर हा महामार्ग बनवला जाणार आहे. या महामार्गासाठी तब्बल  १२ हजार कोटी रुपये  खर्च अपेअपेक्षित आहे. 

 हा महामार्ग का महत्वाचा?

महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर डोंगर माथ्यावरून पठारी भागावर जाण्यासाठी सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये आहेत. कसारा घाट, माळशेज घाट,नाणेघाट ,भोर घाट ,तामिनी घाट ,वरंधा घाट, आंबा घाट गगनबावडा घाट असे एकूण 14 घाटातून रस्ते काढत पठारी भाग जोडला आहे.  प्रत्येक दोन घाटांमध्ये प्रत्येकी 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे.  मात्र माळशेज घाट ते थेट लोणावळ्यातील बोरघाट यामध्ये 70 ते 80 किलोमीटरच अंतर आहे.

 त्यामुळे मुंबई,  ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण एमएमआर रिजन सोबतच जेएनपीटी मधून निघणारे कंटेनर आणि अवजड वाहन या महामार्गावरुन पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले इतर जिल्हे, हैदराबाद बेंगलोर विजापूर आणि इतर शहरांसाठी वाहतुक या महामार्गावरुन होते. त्यामुळे या महामार्गाला लगत असलेला प्रस्तावित उरण कर्जत शिरूर महामार्ग तयार करावा असा प्रशासनाने अहवाल पाठवला होता. मात्र दोन वर्षांपासून हा अहवाल मंत्रालयात धूळ खात पडला होता.

Ajit Pawar: अजित दादा गेले! महाराष्ट्र सुन्न करणाऱ्या घटनेला 1 महिना पूर्ण; 30 दिवसात काय- काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com