जाहिरात

Thane Metro Trial : ठाणेकर सुखावले! वाहतूक कोंडीतून सुटका, आज ट्रायल रन; कोणत्या स्थानकांवर थांबा, जाणून घ्या

ठाण्यातील मेट्रोमुळे येथील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.

Thane Metro Trial : ठाणेकर सुखावले! वाहतूक कोंडीतून सुटका, आज ट्रायल रन; कोणत्या स्थानकांवर थांबा, जाणून घ्या

Thane Metro Trial Run : ठाणे शहर विस्तारत असताना वाहतूक कोंडीचं जाळंही पसरत चाललं आहे. काही मिनिटाच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन् तास प्रवास करावा लागत आहे. अखेर ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आज ठाण्यात गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शन या मार्गावरील पहिली मेट्रो धावणार आहे. याचं ट्रायल रन आज सोमवार, 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मेट्रो ट्रायल रनला हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. ठाणेकरांमध्येही याचा उत्साह पाहायला मिळत आहे.

कशी असेल ठाण्याची मेट्रो? Thane Metro Stations 

ठाणे मेट्रो 4 ही ३२ किलोमीटर तर ४ अ ही २.७ किलोमीटर मार्गावर धावेल. दोन्ही मार्गिका मिळून ३२ स्टेशन असतील. यामध्ये 
1) कॅडबरी 
2) माजीवाडा 
3) कपूरबावाडी 
4) मानपाडा 
5) टिकूजी -नी -वाडी 
6) डोंगरी पाडा 
7) विजय गार्डन 
8) कासरवाडावली, 
9) गोवानिवाडा 
10) गायमुख  
या स्थानकांचा समावेश आहे. 

Ban Heavy Vehicles Decision : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा एकनाथ शिंदेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी का बदलला? 

नक्की वाचा - Ban Heavy Vehicles Decision : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठीचा एकनाथ शिंदेंचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी का बदलला? 

सध्या ठाणे मेट्रो प्रकल्प ४ (वडाळा-घाटकोपर) आणि ४ - अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाची कामं सुरू आहेत. आज होणारी चाचणी घोडबंदर येथील गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शनपर्यंत (13 किमी )होणार आहे. घोडबंदर येथील गायमुख येथून आज सकाळी १०.३० वाजता मेट्रो ट्रेनची चाचणी होणार आहे. ही चाचणी वर दिलेल्या दहा स्थानकातून होईल. 

मिळालेल्या माहितीनुसार, या ट्रायल रननंतर इतर सर्व तांत्रिक गोष्टी तपासून डिसेंबर 2025 पर्यंत ठाण्यातील मेट्रो सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल. कासारवडवली ते गायमुख यांना जोडणारा ग्रीन लाइन 4 A विस्तार 90 टक्के पूर्ण झाला असून या वर्षाच्या अखेरीस तो सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे शहरातील पहिली मेट्रो या वर्षाच्या शेवटी धावण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com