मुंबईकरांनो कृपया लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक 

Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (23 जून) मेगा ब्लॉक असणार आहे.  जाणून घ्या वेळापत्रक...

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Local Mega Block रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (23 जून) मेगा ब्लॉक असणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्या विहारदरम्यान आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर माहीम ते गोरेगाव स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे. 

(नक्की वाचा : मराठी माणसांना मुंबईत घरांसाठी आरक्षण द्या! मुंबईतील संस्थेची मागणी)

कोणत्या कामासाठी घेण्यात येणार आहे मेगा ब्लॉक?

या कालावधीत रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या उशीराने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी 10.55 वाजेपासून ते 3.25 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक   

परिणाम : ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील अप-डाऊन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही फेऱ्या रद्द  तर काही 20 ते 25 मिनिटे उशीराने धावणार आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: 'सगेसोयरे आदेश रद्द करा' OBC शिष्टमंडळानं सरकारकडं कोणत्या मागण्या केल्या?)

हार्बर रेल्वे

स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी 11.40 वाजेपासून ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक   
परिणाम : सीएसएमटी-वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगावदरम्यान धावणाऱ्या फेऱ्या रद्द असणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

(नक्की वाचा: PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला तडा, 5 महिन्यांमध्येच अटल सेतूला पडल्या भेगा?)

पश्चिम रेल्वे

स्थानक : माहीम ते गोरेगाव
मार्ग - अप आणि डाऊन (हार्बर)
वेळ - सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत

परिणाम - सीएसएमटी ते वांद्रे/पनवेल/गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. चर्चगेट ते विरार डहाणू रोडदरम्यान ब्लॉक नसल्याने नियमित फेऱ्या धावणार आहेत.

Advertisement