Mumbai Local Mega Block रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी (23 जून) मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्या विहारदरम्यान आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर माहीम ते गोरेगाव स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला आहे.
(नक्की वाचा : मराठी माणसांना मुंबईत घरांसाठी आरक्षण द्या! मुंबईतील संस्थेची मागणी)
कोणत्या कामासाठी घेण्यात येणार आहे मेगा ब्लॉक?
या कालावधीत रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही गाड्या उशीराने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी 10.55 वाजेपासून ते 3.25 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक
परिणाम : ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील अप-डाऊन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही फेऱ्या रद्द तर काही 20 ते 25 मिनिटे उशीराने धावणार आहेत.
(नक्की वाचा: 'सगेसोयरे आदेश रद्द करा' OBC शिष्टमंडळानं सरकारकडं कोणत्या मागण्या केल्या?)
हार्बर रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी 11.40 वाजेपासून ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक
परिणाम : सीएसएमटी-वडाळा ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे-गोरेगावदरम्यान धावणाऱ्या फेऱ्या रद्द असणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
(नक्की वाचा: PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टला तडा, 5 महिन्यांमध्येच अटल सेतूला पडल्या भेगा?)
पश्चिम रेल्वे
स्थानक : माहीम ते गोरेगाव
मार्ग - अप आणि डाऊन (हार्बर)
वेळ - सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत
परिणाम - सीएसएमटी ते वांद्रे/पनवेल/गोरेगाव लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. चर्चगेट ते विरार डहाणू रोडदरम्यान ब्लॉक नसल्याने नियमित फेऱ्या धावणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world