
Central Railway Breakdown: मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवेत खोळंबा होणे आता नित्याचेच झाले आहे. गुरुवारीही मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने ऑफिस गाठण्याची लगबग असणाऱ्या मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले होते. मात्र आता आजही मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. गणपती उत्सवामुळे मुंबईकांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशातच आज पुन्हा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले. आज सकाळी सहाच्या सुमारास अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान मालगाडीचे इंजिन बिघडले. त्यामुळे लोकल सेवेचाही खोळंबा झाला.
मालगाडीचे इंजिन बिघडल्याने त्यापाठोपाठ येणाऱ्या लोकल अडकून पडल्या. या बिघाडामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या या 20 ते 25 मिनिचे उशिराने धावत आहेत. तर अंबरनाथ वरून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल सेवाही ठप्प झाली आहे. सकाळसकाळी लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याचे सांगण्यात येत आहे.
Sangamner News: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, हल्लेखोर कोण?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world