BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होणार,  कोणत्या प्रकल्पांवर भर असेल?

BMC Budget 2025 : देशातील अनेक राज्यांपेक्षा बीएमसीचा अर्थसंकल्प मोठा असतो. त्यामुळे या अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Budget 2025 : मुंबई महानगरपालिकेचा 2025-26 चा अर्थसंकल्प आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी मंगळवारी सादर होणार आहे. मुंबईकरांसाठी आज काय मोठ्या घोषणा केल्या जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या दहा वर्षात शहराच्या मालमत्ता कराच वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेने रस्ते, पूल, पाणीपुरवठा प्रकल्प, पर्जन्य जलवाहिन्यांसह अन्य कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. या कामासांठी भरीव तरतूद केली जाईल. देशातली सर्वात श्रीमंत महापालिका असल्याने मुंबईच्या अर्थसंकल्पाकडे अनेकांचं लक्ष असतं. मुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर आहे. 

आज सकाळी 11 वाजता बीएमसी कमिश्नर भूषण गगराणी सादर करतील. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पालिका गेल्या दोन वर्षांपासून मुदत ठेवीतून पैसे काढून प्रकल्पांवर पैसे खर्च करीत आहे. 2025-26 च्या अर्थसंकल्पात गगराणी यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान हे मुंबईत सुरू असलेल्या विकासकार्य निधीसाठी नवं स्त्रोत शोधण्याची आहे. 

नक्की वाचा - Mumbai Crime : Shocking! वांद्रे टर्मिनसवरील रेल्वेच्या रिकाम्या डब्यात महिलेचं लैंगिक शोषण

देशातील अनेक राज्यांपेक्षा बीएमसीचा अर्थसंकल्प मोठा असतो. देशातील नागरिकांना केंद्रीय अर्थसंकल्पातून ज्या अपेक्षा असतात, तशाच काहीशा अपेक्षा मुंबईकरांना पालिकेच्या अर्थसंकल्पातून असतात. बीएमसी मुंबईकरांना पाणी, रस्ते, साफ-सफाई, शौचालयासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करवून देते. याशिवाय आरोग्य, वाहतूक, पूल, फ्लायओव्हर, पर्यटन, शिक्षणसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.  

कोणत्या प्रोजेक्टसवर भर दिला जाणार?

मुंबई कोस्टल रोड - वर्सोवा ते भाईंदर

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड

सांडपाणी व्यवस्था (STP)